भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात होणार ‘फेसबुक’ची Entry ! रिलायन्स जिओमधील’हिस्सा’ खरेदी करू शकतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वातील सोशल मीडियाची दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी फेसबुक, भारतातील मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील दिग्गज ग्रुप रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये 10 टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, ह्या दोन कंपन्या लवकरच आपापसात करार करू शकतात. हा करार कोट्यवधी डॉलर्सचा असू शकतो. रिलायन्स जिओचा भारतात जवळजवळ 37 कोटी ग्राहकांचा आधार आहे. विश्लेषक बर्नस्टेन यांनी कंपनीचे मूल्य सुमारे 60 अब्ज डॉलर्सवर ठेवले आहे, म्हणजेच त्याच्या दहा टक्के भाग भांडवल अंदाजे 6 अब्ज डॉलर्सवर व्यवहार करता येईल.

माहितीनुसार, रिलायन्स आणि फेसबुक यांच्यात झालेली चर्चा अजून खूप पुढे गेली होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जगभर प्रवास करण्याच्या बंदीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. या कराराद्वारे फेसबुक भारतातील दूरसंचार आणि डिजिटल क्षेत्रात प्रवेश करेल. महत्त्वाचे म्हणजे जिओ मोबाईल टेलिकॉम, होम ब्रॉडबँड, ई-कॉमर्स यासारख्या बर्‍याच विभागात कार्यरत आहे.

जिओचा व्यवसाय
रिलायन्स जिओचे काम सप्टेंबर 2016 मध्ये सुरू झाले होते. या कंपनीच्या येण्याने भारतीय दूरसंचार क्षेत्रात किंमत युद्ध सुरू झाले. कंपनी अत्यंत कमी दरावर डेटा आणि व्हॉइस सेवा प्रदान करते. एजीआरच्या समस्येमुळे सध्या भारताचे दूरसंचार क्षेत्र नष्ट होत आहे, परंतु रिलायन्स जिओ मजबुतीने टिकून आहे. दरम्यान, कंपनी आपले कर्ज संपवून शून्यावर आणू इच्छित आहे, म्हणूनच कदाचित कंपनी हा भाग विकण्याच्या प्रयत्नात आहे. या अगोदर रिलायन्सने मायक्रोसॉफ्टबरोबर भारतात क्लाउड कंप्यूटिंग सेवा सुरू करण्यासाठी करार केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like