Facebook | ‘या’ कारणामुळे CEO मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Facebook | जगभरातील एक मोठी नेटवर्क कंपनी म्हणजे फेसबुक (Facebook) आहे. फेसबुक हे सोशल मिडिया अँप्स आहे. याचं जाळं संपुर्ण जगात निर्माण झालं आहे. मात्र, फेसबुकबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. फेसबुकचं नाव आता बदलण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. रिब्रॅण्डींगच्या (Rebranding) उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरु असून पुढच्या आठवड्यामध्ये नामांतरणाच्या विषयावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे आता फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (CEO Mark Zuckerberg) याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार (Facebook) सुरु आहे.
याबाबत माहिती द व्हर्जकडून मिळते आहे. मंगळवारी याबाबत माहिती समोर आली आहे.
झुकरबर्ग (CEO Mark Zuckerberg) या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेत बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत 28 ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. पण, त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याचे समजते.

 

दरम्यान, इंटरनेटद्वारे लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यात डिजीटल स्पेसचाही समावेश होतो.
डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या (Virtual reality and augmented reality) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेल्या आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हणतात. तर, या रिब्रॅण्डींगद्वारे कंपनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन एका मोठ्या श्रेत्रामध्ये पूर्णपणे वेगळी सेवा निर्माण करु पाहत आहे.
आधीच या कंपनीच्या उप कंपन्यांमध्ये इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअप (WhatsApp), ऑक्युलस (Oculus) आणि इतर कंपन्या आहेत.
मात्र सध्या सुरु असणाऱ्या या नाव बदलाबाबत चर्चांवर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं फेसबुकने (Facebook) सांगितलं आहे.

 

Web Title : Facebook | facebook plans to change its name to focus on metaverse report marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

Yes Bank Case | नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदी ‘वधारली’, जाणून घ्या आजचे दर