कॉलेज सोडलं, क्लासमेटसोबत ‘प्रेम’, ‘अशी’ होती FB फाऊंडर मार्क झुकरबर्गची ‘लाईफ’अन् Facebook चा ‘प्रवास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यानं आजच फेसबुकची सुरुवात केली होती. फेसबुकच्या यशासोबत मार्कचं आयुष्यही बदलून गेलं. आपल्या काही सीनीयरांकडून आरोप लावल्यानंतर मार्कला कॉलेज सोडावं लागलं होतं. यानंतर त्यांन प्रेम निभवत कसं यश मिळवलं. आज तो एक चांगला पती आणि पिताही आहे. आज आपण मार्कबद्दल सर्वकाही जाणून घेणार आहोत.

मार्क झुकरबर्गचा जन्म 1984 साली न्यूयॉर्क मध्ये झाला होता. मार्कचं सुरुवातीचं शिक्षण न्यूयॉर्कमध्ये झालं. शाळेपासूनच मार्क अभ्यासात चांगला होता. त्याचं अभ्यासात मनही लागत होतं.

12 व्या वर्षीच मार्कला कंप्युटरमध्ये रस होता. जेव्हा मार्कच्या वडिलांनी त्याला C++ नावाचं एक पुस्तक दिलं तेव्हा त्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंटरेस्ट येऊ लागला. त्यानं एक बेसिक मेसेजिंग अ‍ॅपही बनवलं होतं. जकनेट असं त्याचं नाव होतं. ज्याचा वापर त्याचे वडिल आपल्या डेंटल ऑफिसमध्ये करत होते. त्यांची रिसेप्शनिस्ट या प्रोग्रामद्वारे त्यांना इन्फॉर्म करण्याचं काम करत असते.

फेसबुकच्याआधी मार्कनं फेसेमासास नावाची साईट तयार केली होती. यात दोन स्टुडंटच्या फोटोची एकत्र तुलना केली जाऊ शकत होती आणि त्यात सांगितलं जात होतं की, कोण जास्त हॉट आहे. या साईटमुळे शाळेत खूप वाद झाला होता. स्टुडंट्सचं म्हणणं होतं की अशा प्रकारे फोटो अपलोड करणं म्हणजे त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्यासारखं आहे. परंतु मार्क हार मानली नाही. फेसेमासासच्या युजसर्ची संख्या जवळपास 10 लाखांवर गेली.

2004 मध्ये मार्कनं आपल्या मित्रासोबत मिळून द फेसबुक नावाची साईट बनवली होती. यावर युजर आपला प्रोफाईल बनवून फोटो अपलोड करू शकत होते. यानंतर मार्कनं कॉलेज सोडलं आणि तो पूर्ण वेळ फेसबुकसाठीच देऊ लागला.

2004 च्या अखेरपर्यंच फेसबुकचे एक मिलियन्स युजर झाले होते. मार्कनं सर्व लक्ष प्रोग्रामिंगमध्ये लावलं होतं. फेसबुक साईट बनवून काहीच दिवस झाले होते आणि मार्क अडचणीत आला. कारण त्याच्या 3 सिनीयरांनी त्याच्यावर आरोप केले की, मार्कनं त्यांना फसवून त्याच्या खासगी साईटसाठी त्यांच्याकडून कोडींग करून घेतलं.

फेसबुक आपल्या यशाच्या शिखरावर असताना मार्कनं 2012 मध्ये हार्वर्डमध्ये शिकणाऱ्या चीनच्या प्रीसिला चेन सोबत लाँग टाईम अफेअरनंतर लग्न केलं. मार्क आणि प्रीसिला यांना दोन मुली आहेत. 2010 मध्ये टाइम्स मॅगेझिननं मार्कला पर्सन ऑफ द ईयरचा अवॉर्ड दिला. फोर्ब्सच्या सर्वात शक्तीशाली लोकांच्या यादीत मार्कला 35 वा क्रमांक मिळाला होता.

2013 मध्ये फेसबुकनं फॉर्च्यूनच्या यादीत स्थान मिळवलं आणि मार्क या यादीत 28 वर्षांचा सर्वात कमी वयाचा सीईओ होता. 2010 मध्ये अमेरिकेत मार्क झुकरबर्गच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाही आला. द सोशल नेटवर्क असं या सिनेमाचं नाव होतं.