फेसबुक वरचं ‘झेंगाट’ १२ लाखाला पडलं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख ५९ हजार ५०० रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ११ मार्च २०१९ ते २८ मार्च २०१९ या कालावधीत घडला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वानवडी येथील २७ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार अज्ञात मोबाइलधारक आणि बँकेच्या खातेधारकावर फसवणुक आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी यांची फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर महिलेला तुमच्याशी लग्न करतो असे सांगितले.

महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने कस्टम चार्जेस दंड आकारणी चल बदलण्याचे चार्जेस व इन्शुरन्स चार्जेस इत्यादी कारणासाठी स्टेट बँक ऑफ इंडीयामध्ये खाते उघडायचे असल्याचे सांगितले. यासाठी त्याने महिलेला वेळोवेळी वेग-वेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून महिलेची ९ लाख ५६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस करीत आहेत.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव