Facebook Friend | लग्नाचा प्रस्ताव फेटाळला तर फेसबुक फ्रेंडने ‘गावभर’ लावली तरूणीची पोस्टर्स, गुन्हा दाखल

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – Facebook Friend | मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये राहणार्‍या एका तरूणीला विवाहाचा प्रस्ताव धुडकावणे महागात पडले. यामुळे नाराज झालेल्या मुलीच्या Facebook Friend ने ती आपली पत्नी आणि तिचे आई-वडिल त्याचे सासू-सासरे असल्याचे सांगणारे पोस्टर (Poster) त्यांच्याच परिसरात लावले. त्रस्त झालेल्या मुलीने अखेर पोलिसात तक्रार केली आहे.

प्रकरण ग्वाल्हेरच्या बहोडापुर पोलीस ठाण्याच्या (Bahodapur Police Station,) हद्दीतील आहे. येथे पीडित तरूणी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. आरोपी तरुण राजस्थानचा आहे. सीएसपी नागेंद्र सिंह सिकरवार यांनी सांगितले की, तरूणीने तक्रार दिली की, तिची मैत्री सुमारे एक वर्षापूर्वी फेसबुकद्वारे राजस्थानच्या झालावाड येथे राहणार्‍या तरूणासोबत झाली होती.

फेसबुकवर (Facebook) चर्चेदरम्यान दोघांनी मोबाइल नंबर एकमेकांना दिले. ज्यानंतर दोघे फोनवर बोलू लागले. काही दिवसांपूर्वी तरूण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी ग्वाल्हेरला आला आणि तिच्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला.

मात्र, तरूणीने विवाहासाठी नकार दिला. यानंतर तरूणाने मुलीच्या परिसरात असे पोस्टर लावले, ज्यामध्ये त्याने मुलीला आपली पत्नी आणि तिच्या आई-वडिलांना आपले सासु-सासरे असल्याचे म्हटले होते.

सोबतच तरूणाने फेसबुक आणि व्हॉट्सअपसह (WhatsApp) इतर सोशल मीडियावर सुद्धा अशाच प्रकारच्या पोस्ट अपलोड करून शेयर केल्या.
तरूणीने जेव्हा याबाबत त्याला विचारले तेव्हा त्याने म्हटले,
जर या सर्वापासून सुटका हवी असेल तर माझ्या अकाऊंटमध्ये पैसे टाक.
यानंतर तरूणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सीएसपी नागेंद्र सिंह सिकरवार यांनी माहिती दिली की, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
याशिवाय शोध घेतला जात आहे की आरोपीने दबाव टाकून पैसे घेतले आहेत का.
मात्र, पीडितेकडून अद्याप पैशाच्या व्यवहाराची माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title :- Facebook Friend | gwalior facebook friend marriage proposal denial girl poster slander police crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Independence Day | लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यावर होणार फुलांची बरसात

MNGL Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी