‘Facebook’ ला दर महिन्याला मिळतात ‘रिवेंज’ पॉर्नच्या 5 लाख तक्रारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक अनेक वर्षांपासून आपल्या अ‍ॅप वरील रिवेंज पॉर्न काढून टाकण्यासाठी अनके प्रकारच्या टूलवर काम करत आहे. परंतु अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात फेसबुकला काही यश येत नाहीय. मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकला दर महिन्याला जवळजवळ 5 लाख रिवेंज पॉर्न तक्रारींचे आकलन करावे लागते.

सगळ्यात मोठे नेटवर्किंग असलेल्या फेसबुकने या वर्षी सुरुवातीला एका टुलचे लॉन्चिंग केले होते. जे की रिपोर्ट येण्याआधीच त्या पोर्नला स्पॉट करण्याचे काम करत होते. याला नॉनकनसेंसुअल इंटीमेट इमेजेज म्हणून सुद्धा ओळखले जाते. भविष्यात देखील फेसबुक या प्रणालीवर काम करणार आहे. 2017 मध्ये कंपनीने एक पायलट प्रोग्रॅम देखील लॉन्च केला होता.

अनेक नकारात्मक कमेंट नंतर कंपनीने 2018 मध्ये एक रिसर्च प्रोग्रॅम सुरु केला. रिवेंज पोर्नला रोखने आणि पीडितेची मदत करणे हाच हेतू या मागचा होता. लोकांनी फोटोज शेअर केल्यानंतर टीम या गोष्टीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती की, आपण असे काही करू शकतो का जे की रेपोर्टवर रिप्लाय देण्यापेक्षा योग्य असेल. कंटेंट मॉडरेटर्स सोडून फेसबुककडे 25 लोकांची टीम आहे जी की इंटीमेट फोटोज आणि व्हिडीओज शेअर न होण्यासाठी बनवलेले आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like