काय सांगता ! होय, आता चक्क Google आणि Facebook देखील पाकिस्तानला वैतागलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे शेजारील राष्ट्र असलेले पाकिस्तान नेहमीच भारताला त्रास देत आले आहे. आता पाकिस्तानने सोशल मीडियाच्या सुद्धा खोड्या काढल्या आहेत. त्याच्या या खोड्यांना फेसबुक, गुगल वैतागले आहेत. पाकिस्तानने ट्विटर, फेसबुक आणि गुगल यांसारख्या कंपन्यांवर सेन्सॉरशीप लावली आहे. पाकिस्तानमध्ये डिजिटल कायद्यावरून या तीन कंपन्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

या तिन्ही कंपन्यांनी तसेच अनेक कंपन्यांच्या ग्रुप आशिया इंटरनेट कोएलिशनने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जर पाकिस्तानने डिजिटल सेन्सॉरशीप कायदा हटवला नाही तर, पाकिस्तानमधील आमची सेवा बंद करण्यात येईल. पाकिस्तानने हा कायदा तयार करताना आम्हाला विचारात घेतले नाही, असा आरोप सोशल मीडियाच्या कंपन्यांनी केला. हा जो कायदा आहे त्यात वादग्रस्त कंटेंट वरून कोणतेही प्रमाण ठरवण्यात आलेले नाही. जर समजा, एखादा व्यक्ती कोणताही कंटेट वादग्रस्त ठरवत असेल तर तो कन्टेंट हटवण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांकडे अर्ज करू शकतो.

या अर्जानंतर २४ तासात या कंपन्यांनी तो कन्टेंट हटवणे गरजेचे असते. तसेच तात्काळ असेल तर त्याची मर्यादा केवळ ६ तास ठरवण्यात आली आहे. या नवीन कायद्यामुळे पाकिस्तानमध्ये या कंपन्यांना आपले कार्यालय उघडावे लागणार असून, लोकल सर्व्हरही बनवावे लागतील. पाकिस्तान बाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या अकाउंट वरती लक्ष ठेवावे लागेल. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास कंपन्यांना ५० कोटी रुपयांचा दंड भरायला लागणार आहे. हा कायदा बंद करण्यासाठी या कंपन्यांनी सरकारला विनंती केली आहे. अन्यथा सेवा बंद करण्याचा इशाराही दिला आहे.