Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Facebook | नाओमी नावाच्या महिलेला आपल्या नात्याची सत्यता घटस्फोटानंतर समजली, ज्यानंतर तिला खुप वेदना झाल्या. नाओमीने तिच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाची सर्व कथा सांगितली आहे.

नाओमीने लिहिले आहे, एक दिवस माझ्या फोनवर फेसबुकचे एक नोटिफिकेशन आले. माझा एक्स हसबंड डेव्हिडची आँटी लिजने एका पोस्टमध्ये आम्हा दोघांना टॅग करून शुभेच्छा दिल्या होत्या. हे वाचून मला आश्चर्य वाटले. कारण आम्हाला वेगळे होऊन 8 महिने झाले होते. या गोष्टीसाठी शुभेच्छा देणे अजब वाटले. या पोस्टमध्ये जे लिहिले होते ते वाचून तर मी हैराण झाले.

आँटीने आपल्या पोस्टमध्ये एक छोटे बाळ मॅक्सचे जगात स्वागत करताना लिहिले होते की, ती आपल्या भाच्याला भेटण्यासाठी अतूर आहे. तिने हे सुद्धा लिहिले होते की, आई आणि मुल दोघे ठिक आहेत. मुलाचे डोळे आणि नाक आपल्या कुटुंबावर गेले आहे. मला वाटले आँटीला इतर कुणाला तरी शुभेच्छा द्यायच्या असतील आणि त्यांनी चुकून मला टॅग केले.

नाओमीने लिहिले, हैराण करणारी गोष्ट ही होती की जेव्हा आँटीने ती पोस्ट काही वेळातच एडिट केली होती. शुभेच्छांचा संदेश तोच होता तिथून माझे नाव हटवले होते तर डेव्हिडचे नाव तसेच होते. मला रहावले नाही आणि मी त्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेऊन माझ्या मित्रांच्या व्हॉट्सअप चॅट ग्रुपवर टाकला. मी माझ्या मित्रांना विचारले, याचा अखेर अर्थ काय असू शकतो.

माझ्या एका मैत्रिणीने लिहिले की, असे असू शकते की ते डेव्हिडचे मुल असावे. आणि हे ऐकून मला वाटले मी बेशुद्धच पडत आहे. मला अगोदरच्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. बरोबर आठ महिन्यापूर्वी डेव्हिडने मला म्हटले होते की, त्याच्या हृदयात आता माझ्यासाठी प्रेम नाही. त्याने खुप प्रयत्न केला की आमचे नाते पहिल्यासारखे व्हावे परंतु हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्याने म्हटले की, आपण दोघांनी वेगळे होणेच योग्य आहे. दरम्यानच्या काळात माझे मिसकॅरेज झाले होते.
यानंतर आम्ही वेगळे झालो. मी खुप निराश होते. डॉक्टरांकडून उपचार करून घेतले.

नाओमी पुढे म्हणते, जेव्हा मी आँटीला पर्सनल मेसेज करून तिच्या पोस्टबाबत विचारले तेव्हा तिचे कोणतेही उत्तर आले नाही.
कारण आँटीला माहित नव्हते की मी आणि डेव्हिड वेगळे झालो आहोत.
शोधाशोध केल्यानंतर मला समजले की, डेव्हिड कोणत्या तरी मेरी नावाच्या महिलेसोबत राहात आहे आणि आम्ही दोघे वेगळे झाल्यानंतर बरोबर आठ महिन्यानंतर त्या दोघांना मुल झाले आहे.
आँटीला आम्ही वेगळे झाल्याचे माहित नसल्याने तिने मला शुभेच्छा दिल्या.

नाओमीने लिहिले, मागील काही दिवसांपासून मी प्रचंड संतापात आहे.
डेव्हिडने यासाठी माझी माफी मागितली पाहिजे… आणि त्या महिलेने सुद्धा. कारण सर्वकाही माहित असताना एका विवाहित माणसासोबत तिने अफेयर केले.
पोर्टलवर डेव्हिड आणि मेरीचे नाव सार्वजनिक करण्याचा हेतू हाच आहे की त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांचे सत्य समजावे,
त्यांना कळावे की या दोघांनी माझ्यासोबत काय केले.
डेव्हिडने आता माझ्या समोर यावे किंवा घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान कोर्टात भेटावे,
मी त्याचा खरा चेहरा त्याला दाखवूनच शांत बसेन.


Facebook | husband wife divorce romance relationship

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया