Facebook India | छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी पैसा असो की तंत्रज्ञान Facebook देतंय प्रत्येक सुविधा, जाणून घ्या कोणाचा होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Facebook India | कोविडनंतर (Covid-19) पुन्हा एकदा विकासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे. यामध्ये एसएमई (लघु, मध्यम उद्योग इंडस्ट्री) Small and Medium Enterprises (SMEs) व्यवसायिकांची सर्वात मोठी भूमिका आहे. लघु आणि मध्यम उद्योग भांडवल आणि आकाराने छोटे असूनही प्रभावशाली असतात. ते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे माध्यम असतात. यासाठी त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. कोरोना महामारीच्या काळात या व्यावसायिकांनी धैर्य आणि हिंमतीचा आदर्श मांडला आहे. सोबतच नवीन तंत्रज्ञानाने आपल्या व्यवसायाला गती प्रदान केली. फेसबुक इंडिया (Facebook India) च्या लघु आणि मध्यम व्यवसायाच्या संचालक अर्चना वोहरा (Archana Vohra, Director, Small and Medium Business) यांनी जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, स्मॉल बिझनेस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन आहे आणि मेटा त्यांच्यासाठी विकासाच्या संधी अनलॉक करण्यासाठी अगोदरपासूनच अनेक भूमिका साकारात आहे.

 

त्या म्हणाल्या की, फेसबुक (Facebook India) आणि इंस्टाग्राममुळे (Instagram) या व्यवसायिकांची पोहोच ग्लोबल झाली आहे. 30 कोटीपेक्षा जास्त लोक फेसबुकवर एखाद्या भारतीय स्मॉल बिझनेसला लाईक किंवा फॉलो करतात. JFK-Facebook च्या ऑनलाइन सर्वेमध्ये समोर आले की, 96 टक्के नवीन बिझनेस ऑनालाइन (Online Business) सुरू झाले. यापैकी 83 टक्के बिझनेस फेसबुकसोबत सुरू सुरू झाले.

 

लघु आणि मध्यम व्यवसायिकांसाठी फेसबुक इंडियाच्या (Facebook India) योजना, व्यवसायाची बदलती स्थिती आणि एसएमबी व्यवसायिकांसाठी सध्याच्या नवीन संधींवर वोहरा यांनी चर्चा केली.

 

ऑनलाईन बिझनेस वाढवायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

– फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पेज बनवा.

– जाहिरातीवर छोट्या बजेटने टेस्ट करा की आपली पोहोच कितीमध्ये येत आहे.

– फेसबुक, इंस्टा आणि whatsapp तिन्हीचा वापर करा.

– सतत पहात राहा की तुमचे कॅम्पेन किती इफेक्टिव्ह आहे तेव्हाच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल.

– पर्सनलाईज अ‍ॅड सुविधेचा भरपूर लाभ घ्या. तुम्ही त्यांनाच टार्गेट करा जे भविष्यातील ग्राहक असू शकतात.

– आपला हेतू स्पष्ट करा.

 

Web Title :- Facebook India | facebok small business promotion initiative for small medium businesses in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO ने गुंतवणूक पर्याय म्हणून InvIT ला दिली मंजूरी, PF च्या पैशांचा सरकार करणार ‘या’ साठी वापर; मिळेल जास्त व्याज!

IPL 2022 | क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर ! IPL च्या 15 व्या हंगामाबाबत BCCI चे सचिव जय शाहांकडून मोठी घोषणा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 86 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी