आता facebook होणार अधिक सुरक्षित ; येणार ‘हे’ नवीन फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. आता फेसबुकसाठी नवं डिझाइन तयार केलं आहे. यामध्ये फेसबुकच्या डिझाइनमध्ये तसेच न्यूज फिडमध्ये बदल करण्यात आले आहेत. फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरंस F8 मध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकसाठी नवं डिझाइन जारी केले आहे. फेसबुकने आणलेले नवीन फीचर खालीलप्रमाणे –

facebook Messenger फीचर –

मेसेंजरचं नवं व्हर्जन 30MB पेक्षा कमी मेमरी वापरुन फोनमध्ये सेव्ह करता येईल, म्हणजे आधीपेक्षा 20% कमी मेमरी वापरली जाणार आहे. Messenger च्या नवीन फीचरमुळे मेसेंजरवर चॅट करताना फेसबुकचे व्हिडीओ दोन्ही युजर एकत्र पाहू शकतील. यामुळे स्टेटस मेसेज सेट करणं आणि फोटो शेअर करणं आधीपेक्षा सोपं झालं आहे. फेसबुक लवकरच डेस्कटॉपसाठीही मेसेंजरचं नवं व्हर्जन लाँच करणार आहे.

Facebook Redisign फीचर –

एखाद्या ग्रुपला जॉइन केल्यानंतर तुम्हाला पर्सनलाइज्ड न्यूज फीड मिळेल, ही फीड केवळ तुमच्या मित्रांशी किंवा ओळखणाऱ्यांशी निगडीत असेल. याशिवाय ग्रुप इंटरअॅक्शनचाही पर्याय मिळेल.यामध्ये ग्रुप्स आणि इव्हेंट्सला हायलाइट करण्यात आलं आहे. फेसबुकच्या नव्या अपडेटला FB5 नावाने ओळखलं जाईल.

Meet New Friends फीचर –

या फीचरमुळे सारखीच आवड असलेल्या अनोळखी व्यक्तींना सर्च करता येईल. तसेच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या इव्हेंट्सबाबतही माहिती मिळेल.

Instagram फीचर –

शॉपिंगसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.’ याचबरोबर, इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात. तसेच इंस्टाग्रामच्या कॅमेरा इंटरफेसमध्ये Create Mode हा नवा पर्याय मिळेल. याद्वारे फोटोमध्ये कंटेंट अॅड करणं सोपं होईल आणि उत्तम पद्धतीने शेअर देखील करता येईल. याशिवाय इंस्टाग्रामवरुन फोटो किंवा व्हिडीओंना मिळालेले लाइक लपवण्याच्या एका खास फीचरची इंस्टाग्रामकडून चाचणी सुरू आहे.

Oculus Rift S आणि Oculus Quest ची विक्री पुढील महिन्यापासून –

Oculus Rift S आणि Oculus Quest या दोन्ही फोनची विक्री 12 मे पासून सुरू होत असून 22 देशांमध्ये हे फोन उपलब्ध असतील. याविषयीची माहिती फेसबुकने व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेटवर दिली आहे.

फेसबुक ‘डेटिंग’ फीचर –

तरुणांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लवकरच डेटिंग फीचर आणणार असून केवळ डेटिंगसाठीच नाही तर तरुण तरुणींमधील हे नातं अधिक घट्ट व्हावं, दीर्घ काळ टिकावं असा त्याचा उद्देश आहे, असं सांगितलं जात आहे. अनेक लोक आपला आयुष्यभराचा साथीदार शोधण्यासाठी फेसबुक वापरतात.

त्यामुळे डेटिंगपासून सुरुवात करून विवाहबद्ध होण्यापर्यंत फेसबुक एखाद्या मध्यस्तासारखी मदत करणार आहे. फेसबुकने हे फीचर गेल्यावर्षी जारी केलं होतं, आता हे फीचर 14 देशांमध्ये सुरू केलं जाणार आहे. यामध्ये Secret Crush नावाचं एक नवं फीचर आलं आहे. हे फीचर सर्वांसाठी ऑप्शनल असेल. हे फीचर वापरावं की नाही ते अकाऊंट हाताळणाऱ्यावर अवलंबून असेल. यामध्ये प्रायव्हसी आणि सेफ्टी या दोन्हींचा विचार केला गेला आहे.

ही माहिती कोणालाही देण्यात येणार नाही. तसेच तुमचे फेसबुक फ्रेंडस् देखील हे पाहू शकणार नाहीत. केवळ जे लोक डेटिंग प्रोफाईल वापरत असतील असेच लोक एकमेकांना डेट करू शकतील.