Facebook वापरकर्त्यांसाठी महत्वाची माहिती ! आता login करण्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुक (Facebook) अकाउंट वापर करणाऱ्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. फेसबुक च्या एकूण युझर्सपैकी मोबाईलवर फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मोबाईलवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सकरिता फेसबुकने आता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) प्रक्रिया अत्यावश्यक केल्या आहे. Facebook अकाउंटच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित केली जाणार आहे.
दरम्यान, Facebook ने टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया डेस्कटॉपवर लॉगिनसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय २०१७ रोजी घेतला होता. तर आता ती प्रक्रिया मोबाईल युझर्ससाठीही लागू असेल. iOS, Android अशा दोन्ही प्रकारच्या मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्या युझर्सना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक असेल. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या किंवा नव्या मोबाइलवरून तुम्ही लॉगिन करणार असाल, तर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय अकाउंट लॉगिन होणार नाही. Facebook अकाउंट हॅक होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. तसेच Facebook ने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही युझर्सच्या माहितीच्या सुरक्षितता आणि संरक्षणासाठी लक्ष देतो. युझर्सची अकाउंट्स हॅकर्सकडून हॅक केली जाऊ नयेत, यासाठी आमचा प्लॅटफॉर्म सुरक्षित असावा, याकरिता आम्ही असे उपाय राबवतो. असे सांगण्यात आले आहे.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) काय आहे ?
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) हे एक सुरक्षिततेसाठीची व्यवस्था आहे. वापरकर्ते सतत मोबाइल, लॅपटॉप, टॅब किंवा डेस्कटॉप यावरून Facebook अकाउंट वापरतात. तर त्यापेक्षा वेगळ्या उपकरणावरून तुमच्या Facebook अकाउंटला लॉगिन करण्याचा प्रयत्न झाला, की त्या वेळी लॉगिनसाठी फक्त पासवर्ड पुरेसा होत नाही. तुमचेच अकाउंट तुम्ही ओपन करत आहेत का, याची खात्री पटण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर एक SMS सेंड केला जातो. किंवा तुमच्या रोजच्या उपकरणावर अलर्ट पाठवून ते तुम्हीच आहात का याची खात्री करण्यासाठी क्लिक करायला सांगितलं जातं.
म्हणजेच, समजा तुमच्या Facebook अकाउंटचा पासवर्ड कोणाला समजला आणि त्या व्यक्तीने तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, तरी ते उघडू शकणार नाही. कारण तो वेगळ्या साधनावरून लॉगिन करणार असल्याने त्याचं नोटिफिकेशन किंवा SMS तुम्ही Facebook नेहमी ज्या साधनावरून वापरता त्या क्रमांकावर किंवा उपकरणावर येईल. पासवर्ड टाकलेला असला, तरी तो कोड टाकल्याशिवाय अकाउंट सुरू होऊ शकणार नाही. शिवाय कोणी तरी तुमचं अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला त्याचं SMS लगेच येईल. यामुळे तुम्ही लगेच पासवर्ड बदलू शकता.