Twitter सारखे ‘हे’ फिचर आता येतंय Facebook मध्ये; जाणून घ्या काय आहे ते…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अमेरिकेची कंपनी Facebook कडून नवे फिचर आणले जात आहे. हे फिचर फेक न्यूज आणि अफवांना नियंत्रणात आणण्याच्या हेतूने आणले जात आहे. येत्या काही दिवसांत जर तुम्ही कोणते आर्टिकल शेअर केले तर तुम्हाला एक पॉप अप मिळेल.

Facebook हे फिचर्स कॉपी करणारे माध्यम म्हणून ओळखले जाते. सध्या फेसबुकमध्ये असलेले बहुतांश फिचर्स इतर सोशल मीडियावर यापूर्वीच होते. त्यानंतर आता फेसबुकने त्यांच्याकडे घेतले आहेत. त्यातच आता जेव्हा तुम्ही कोणतेही आर्टिकल शेअर करत असाल तेव्हा तुम्हाला पॉप अपमध्ये विचारले जाईल की, तुम्ही ते आर्टिकल वाचले की नाही. हे फिचर यापूर्वी ट्विटरवर आले होते. जेव्हा तुम्ही Twitter वर कोणतेही आर्टिकल रिट्विट करता तेव्हा तुम्हाला विचारले जाते की तुम्ही हे पहिले वाचावे.

Facebook ही आता अशाचप्रकारच्या फिचरवर टेस्टिंग करत आहे. फेसबुकनुसार, फिचर जगभरात 6 टक्के अँड्राईड फेसबुक युजर्ससाठी जारी केले गेले आहे. सध्या हे फिचर टेस्टिंग फेजमध्ये आहे. फेसबुकने सांगितले, की या नव्या पॉप अप फिचरच्या माध्यमातून युजर्सला शेअर करण्यापूर्वी चांगली आयडिया मिळेल. याप्रकारे सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांपासून वाचता येऊ शकते.