Facebook नं सादर केली ‘Messenger Rooms’, व्हिडिओ Call वर बोलू शकतात 50 लोक

पोलिसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन दरम्यान लोकांमध्ये संवाद सुलभ करण्यासाठी फेसबुकने मेसेंजर रूम्स सुरू केले आहेत. कंपनीने ग्रुप व्हिडिओ चॅट आणि सोशल इंटरॅक्शनला लक्षात घेत हे बनवले असून लोक कोणतीही ऍक्टिव्हिटी म्हणजे सेलिब्रेशन, गेम नाईट, बुक क्लब यासाठी ‘रूम’चा वापर करू शकतात. मेसेंजर रूममध्ये एकाच वेळी सुमारे ५० लोक व्हिडिओ कॉलवर बोलू शकतात.

मार्क झुकरबर्गने रात्री उशिरा या नवीन फीचरची घोषणा करत सांगितले की तुम्हाला फक्त तुमच्या मित्राला मेसेंजर रूमसाठी एक लिंक पाठवायची आहे, ज्यासाठी त्याला फेसबुकवर असणे आवश्यक नाही. लिंकद्वारे तो संभाषणात सामील होईल. व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामद्वारे देखील रूम तयार आणि लिंक पाठवली जाऊ शकते.

मेसेंजर रूमवर व्हिडिओ कॉलसाठी कोणतेही टाइम लिमिट नसून सोबतच AI सारखे फिचर देखील आहेत. यामुळे युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टरचा वापर करू शकतात.

न्यूजफिडमध्ये जाऊन आपला मित्र जिथे आहे ती रूम शोधू शकता आणि त्याला ‘Hi’ म्हणू शकता. यामध्ये रूमच्या होस्टला रूम लॉक करण्याचा पर्याय देखील होता, जेणेकरून कोणीही त्यात प्रवेश करू शकणार नाही. तसेच युजर्सला काढण्याचा पर्याय देखील होता. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या टूलप्रमाणेच त्यात तुम्हाला बोलण्यासाठी टायमिंग फिक्स करावा लागत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक या ‘Room’ ची टेस्टिंग काही देशात करत आहे आणि येत्या आठवड्यात याला जागतिक स्तरावर लाँच करेल.

WhatsApp कॉलमध्ये ऍड करा दुप्पट लोक
झुकरबर्गने आपल्या मालकीच्या व्हाट्सएप मेसेंजरचाही उल्लेख केला. पोस्टमध्ये म्हटले की कोरोना विषाणूच्या दृष्टीने आम्ही आमच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरच्या ग्रुप कॉलमध्ये ८ लोकांना ऍड करण्याची सुविधा दिली आहे, जी अगोदर ४ होती.