Facebook च्या ‘कोलाब’ अ‍ॅपची चायनीज TikTok अ‍ॅपला ‘टक्कर’ !

पोलिसनामा ऑनलाईन – फेसबुकने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. हे संगीत तयार करणारे अ‍ॅप आहे आणि त्याचे नाव कोलाब आहे. फेसबुकने चिनी अ‍ॅप टिकटॉकच्या स्पर्धेत हे अ‍ॅप लाँच केले आहे. कोलाब अ‍ॅप या वर्षाच्या मेमध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु त्यावेळी हा अ‍ॅप केवळ इनवाइटवर उपलब्ध होता. आता कंपनीने अधिकृतपणे ते सुरू केले आहे.

येथून डाउनलोड करू शकता

हे फेसबुक संगीत बनवणारे अ‍ॅप अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. हे अ‍ॅप केवळ आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हा अ‍ॅप अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी नाही, हा अ‍ॅप केवळ अमेरिकन वापरकर्त्यांसाठी आहे.

वैशिष्ट्ये

याची वैशिष्ट्ये टिकटॉकसारखी आहेत. 15 सेकंदाचे लहान व्हिडिओ तयार करू शकतात. आवडीनुसार संगीत जोडू शकता. लिप सिंक सुविधेव्यतिरिक्त, वापरकर्ते त्यांच्या उपस्थितीशिवाय व्हिडिओ तयार करू शकतात.

तीन भागात व्हिडिओ

कोलाब अ‍ॅपमध्ये, वापरकर्ते गाण्यावर तीन भागात व्हिडिओ बनवू शकतात. इतर दोन भागांसाठी ते दोन मित्रांना आमंत्रित करू शकता. ज्यात अन्य वापरकर्ते पोस्ट केलेले व्हिडिओ वापरुन व्हिडिओ तयार करू शकतात. व्हिडिओमध्ये गाणे गायले असल्यास त्यामध्ये मित्र गिटार वाजवू शकतो आणि दुसरे संगीत देऊ शकतो.

फोनवर सेव करु शकत नाही

कोलाब अ‍ॅपमध्ये तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू शकतात.परंतु ते इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर शेअर करण्यासाठी कोलाबवर प्रथम सेव करावे लागतील. परंतु ते फोनमध्ये सेव करता येत नाहीत.