Facebook Game : अनेक लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारा Gaming Tab लाँच

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – फेसबुक हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. फेसबुक आपल्या मेसेंजर ॲपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केला आहे.

फेसबुकने आपल्या अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन वेगळं गेमिंग अ‍ॅप आणलं आहे. या नव्या अ‍ॅपसाठी फिडबॅकही घेण्यात येत असल्याची माहिती फेसबुकने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

असे वापरा Gaming Tab – फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग ग्रुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.