‘या’ कारणामुळं Facebook युजर्सला ‘चार्ज’ आकारू शकतं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या युजर्सला मेंबरशीप फी आकारण्याची शक्यता आहे. फेसबुक हे संवादाचे प्रभावी माध्यम असून सध्या फेसबुकचे जगभरात दोन अब्जाहून अधिक युजर्स आहेत.

फेसबुकची सर्व सेवा यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळते. काही दिवसांपूर्वीपर्यंत साइनअपच्या खाली ‘It’s Free and always will be’ अशी टॅगलाइन होती. आता ती बदलण्यात आली असून ती ‘It’s quick and easy’ अशी केली आहे. त्यामुळे फेसबुक आपल्या युजर्सला मेंबरशीप फी आकारण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की फेसबुक युजर्सना पेड सबस्क्रिप्शनदेखील ऑफर करणार असेल. या सर्व प्रकरणी फेसबुककडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

फेसबुकच्य क्रिप्टोकरन्सीचे अनावरण –

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकही आता आपली स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ बाजारात आणणार आहे. फेसबुकने बिटकॉईनसारखे नवीन डिजिटल चलन आणण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. फेसबुक व 27 कंपन्यांनी एकत्र येत नवीन चलन लिब्राचे प्रतिकृतीचे अनावरण केले. हे नवीन डिजिटल चलन हे जगभरातील बँकिंग सुविधेपासून वंचित लोकांना ई-कॉमर्स आणि आर्थिक सेवा पुरविणार आहे. या करन्सीचा वापर मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट, कॅब बुकिंग यासह इतर ऑनलाईन पेमेंटसाठी वापर करता येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –