फेसबुकलाही येणार WhatsApp सारखं ‘हे’ लाेकप्रिय फीचर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संवाद साधण्यासाठी जास्तीत जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणजे व्हाॅट्स अ‍ॅप आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्सना नवीन नवीन सुविधा देत असतं. व्हाॅट्स अ‍ॅपला मेसेज डिलीट करण्यासाठी एक खास सुविधा आहे. डिलीट फॉर एव्हरीवन असा हा नवीन पर्याय आहे. हीच व्हाॅट्स अ‍ॅपची सुविधा आता फेसबुकलाही येणार आहे. पूर्वी अशी सुविधा फेसबुकला नव्हती.

या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर काम करतं अगदी तशाच पद्धतीने आता फेसबुकवरचे युजर्स मेसेज डिलीट करू शकणार आहेत. फेसबुक युजर्ससाठी नक्कीच याचा चांगला फायदा होणार आहे. फेसबुकवर आता मेसेंजरमध्ये अनसेंड असे एक बटण देण्यात येणार आहे. परंतु मेसेज डिलीट करण्यासाठी युजर्सकडे जवळपास 10 मिनिटांचा वेळ असणार आहे याचीही युजर्सने नोंद घेणे गरजेचे आहे. हे नवं फिचर आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉइडमधील काही व्हर्जनमध्ये सुरू झाले आहे. लवकरच सर्व मेसेंजरमध्ये हे फीचर उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

फेसबुक मेसेंजरवर असा करा मेसेज डिलीट
युजर्सने सर्वप्रथम जो मेसेज डिलीट करायचा आहे तो सिलेक्ट करावा.
सिलेक्ट केल्यानंतर युजर्सना दोन पर्याय देण्यात येतील.
एक ‘Remove for everyone’ तर दुसरा ‘Remove for You’ पर्याय देण्यात आला आहे.
‘Remove for everyone’ या पर्यायावर क्लिक केले असता तो मेसेज डिलीट केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. फेसबुकने ही सुविधा कधी सुरू करणार हे अद्याप सांगितले नसले तरीही 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीला सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. काही वर्षांपूर्वी गुगलचा ऑर्कुट नावाचा प्लॅटफाॅर्म संवाद साधण्यासाठी वापरला जायचा. परंतु काही काळासोबत बदल न केल्याने तो बंद झाला आहे. गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी विशेष काळजी घेत आहे आणि नवनवीन फिचर आणत आहे असं दिसत आहे.