एकाचवेळी 50 जणांना करा व्हिडीओ कॉल, WhatsApp Web साठी नवीन ‘फीचर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकच्या मालकीचे असलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांना प्रत्येकवेळी नव-नवीन सुविधा उपलब्ध करुन देत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅप वेबवर (Whatsapp web) फेसबुक मेसेंजर रुम्स (Facebook Messenger rooms) हे नवीन फीचर्स आलं आहे. याच्या माध्यमातून आपण एकाचवेळी ५० जणांना व्हिडीओ कॉल करु शकतो. वापरकर्ता यावरुन अमर्यादित वेळेपर्यंत व्हिडीओ कॉल करु शकतो. अलीकडेच हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप वेबवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. हे फक्त डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर वापरले जाऊ शकते. स्मार्टफोनवर हे फीचर केव्हा उपलब्ध करुन दिले जाईल, याबाबत अजूनही साशंकता आहे. काही महिन्यापूर्वी फेसबुक मेसेंजर रुम्स वर हे फीचर ग्रुप व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सुरु करण्यात आले होते.

अशा पद्धतीने करा ‘या’ फीचरचा वापर..
१. Messenger Rooms चा वापर करण्यासाठी Whatsapp web चे नवीन अपडेट व्हर्जन पाहिजे.

२. रुम्स क्रिएट करण्यासाठी सर्व पहिल्यांदा Whatsapp web सुरु करा. स्क्रीनच्या सर्वात वरती डाव्या बाजूला तीन डॉट्स वर क्लिक करा. असे केल्यावर एक नवीन विंडो ओपन होईल आणि हे फिचर दिसेल.

३. त्यानंतर खाली दिलेल्या ‘Create a Room’ या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर continue in messenger वर क्लिक करा. आता तुम्ही सहज व्हिडीओ कॉल करु शकता.

‘Search the Web’ नावाचे आले फीचर
चुकीच्या बातम्यांना आला घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांसाठी ‘सर्च द वेब’ (Search the Web) नवीन फीचर आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप च्या ब्लॉगनुसार, Search the Web नावाचे फीचर वेबवरील मेसेजसमोर सर्च बटण तयार होईल. तुम्ही या मेसेजसोबत दिलेल्या मॅग्निफाइंग ग्लास (सर्च बटन) चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनच्या डीफॉल्ट ब्राउझरवर रिडायरेक्ट केले जाईल, जेथे मेसेज अपलोड केला जाईल. या माध्यमातून वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप वरून थेट वेबवर पाठविलेले मेसेजेस सर्च करू शकतील आणि हे तपासू शकतील की पाठविलेला मेसेज चुकीचा आहे की नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like