मुकेश अंबानी ठरले जगातील 5 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यावसायिक, मार्क झुकरबर्गच्या रँकिंगला ‘धोका’

पोलीसनामा ऑनलाइन : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे आणि ते जगातील 5 वे श्रीमंत व्यावसायिक बनले आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम नेटवर्थनुसार मुकेश अंबानी 75 अब्ज डॉलर्स (सुमारे 5.57 लाख कोटी रुपये) संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

प्रॉपर्टीच्या बाबतीत मुकेश अंबानी आता फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग (89 अब्ज डॉलर्स) च्या जवळ आले आहेत. मात्र अद्याप या दोघांच्या मालमत्तेत बराच फरक आहे. दरम्यान फोर्ब्स अब्जाधीशांच्या संपत्तीचे मूल्यांकन करतो. जगभरातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांमुळे फोर्ब्सचा डेटा बदलत असतो.

मुकेश अंबानी यांच्या पुढे कोण :
याक्षणी, अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस 185.8 अब्ज डॉलर्ससह फोर्ब्सच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. बिल गेट्स (113.1अब्ज डॉलर्स), एलव्हीएमएचचे बर्नार्ड अर्नोल्ड अँड फॅमिली (112 अब्ज डॉलर्स), फेसबुकचे मार्क झुकरबर्ग (89 अब्ज डॉलर्स) अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी 72.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी 5 व्या आणि बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफे सहाव्या स्थानावर आहेत.

रिलायन्सला कोणत्या गोष्टीचा फायदा :
रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच राइट इश्यू आणि जियो प्लॅटफॉर्मवर संयुक्त गुंतवणूक आणि बीपीच्या गुंतवणूकीद्वारे एकूण 2,12,809 कोटी रुपये जमा केले. त्याचा फायदा कंपनीच्या स्टॉक प्राइस आणि मार्केट कॅपवरही झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप खूप वेगवान झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप गेल्या सहा वर्षांत 10 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यापैकी मागील 10 महिन्यांत 4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्तही झाली आहे. मुदतीच्या 9 महिन्यांपूर्वी रिलायन्सने हे यश संपादन केले.

रिलायन्सची शेअर किंमत 2000 च्या पलीकडे
बुधवारी, रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर किंमत 2000 रुपयांच्या पातळीवर गेली. व्यवसायाच्या शेवटी, रिलायन्सच्या शेअर्सची किंमत 2004 रुपये होती. त्याचबरोबर मार्केट कॅपवर बीएसई निर्देशांक 12 लाख 70 हजार कोटींच्या पुढे गेला आहे.