Facebook New Design | फेसबुकचा मोठा निर्णय ! FB आत नव्या ‘रंगात’ अन् नव्या ‘ढंगात’, जाणून घ्या काय-काय होणार बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  फेसबुक (Facebook New Design) हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया व्यासपीठ (Social media platform) आहे. युजर्सना नवनवीन सुविधा देण्यासाठी फेसबुककडून (Facebook New Design) नेहमीच प्रयत्न केले जातात. युजर्सचे अनुभव आणखी समृद्ध करण्याच्या उद्येशाने नवे बदल देखील केले जातात. याच संदर्भातील एक मोठा बदल फेसबूककडून केला जाणार आहे.

भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतीय युझर्ससाठी फेसबुककडून इंटरफेसमध्ये (Interface) मोठे बदल केले जाणार आहेत.
यात फेसबुक पेजवरुन Like बटण काढून टाकण्यात येणार आहे.
तर एखाद्या पेजच्या फॉलोअर्सवर (page followers) लक्ष केंद्रीत करणंही कमी केलं जाणार आहे.
फेसबुक पेजचं हे नवं डिझाइन (Facebook New Design) या वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आले होते.
हे नवं व्हर्जन भारतामध्ये अधिकृतरित्या लाँच करण्यात येत आहे.

असे असेल फेसबुक

फेसबुक पेजचं नवीन डिझाइन आणि युझर इंटरफेसनुसार पेजची मांडणी करण्यात आली आहे.
अत्यंत साधी आणि सोपी अशी मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये एक डेडिकेटेड न्यूज फीड सेक्शन (Dedicated news feed section) असणार आहे.
तसे युझर्सना केमेंट्स, संवाद आणि आपल्या प्रशंसकांशी जोडता येण्याची सुविधा देण्यात आली आहे.

फेसबुकनं काय म्हटलं ?

फेसबुकच्या नव्या इंटरफेसमुळे युजर्सना ट्रेंड फॉलो (Follow the trend) करणं, फ्रेंड्ससोबत संवाद साधणं आणि प्रशंसकांशी जोडलं जाणं अतिशय सोपं होणार आहे.
न्यूज फीडसाठी स्वतंत्र पर्याय याशिवाय अन्य सेलिब्रिटी, पेजेस, ग्रुप्स आणि ट्रेंडिंग कंन्टेंटसारखे पर्याय युजर्सना सुचवले जातील असं नवं डिझाइन (Facebook New Design)
असणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

 

आधी पेक्षा आधिक सुरक्षित

फेसबुकचं नवं डिझाइन आधिपेक्षा अधिक सुरक्षित (Safe) असणार आहे, असा दावा फेसबुकने केला आहे. यामध्ये द्वेष (Hete Speech), हिंसा, लैंगिक शोषण इत्यादी आक्षेपार्ह माहितींचा शोध घेण्यास अधिक मदत होणार आहे.
याशिवाय वापरकर्त्यांना मिळणारी माहिती योग्य आणि खोटी नाही याची खात्री पटावी यासाठी पेजवर व्हेरिफाइड बॅचची दृश्यता वाढवण्यात येणार आहे.
म्हणजे व्हेरिफाइडचं टिकमार्क (Verified Tickmark) अधिक बोल्ड करण्यात येणार आहे.

 

Web Title : Facebook News Design | facebook new design users india shifted focus followers and removed likes button

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cinema halls and Multiplexes Reopen | राज्यात ‘या’ तारखेपासून उघडतील चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स, ठाकरे सरकारने जारी केले एसओपी

Mumbai Cruise Drugs Case | समीर वानखेडे यांच्या हेरगिरीमागे एखादा मोठा पोलीस अधिकारी? आर्यन खान ड्रग्ज केसच्या तपास अधिकार्‍याचा गंभीर आरोप

WhatsApp Loan | व्हॉट्सअपवर 10 मिनिटात मिळेल 10 लाख रुपयांचे बिझनेस लोन, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रोसेस