Whatsapp लगेच अपडेट करा, नाहीतर…

सॅनफ्रान्सिस्को : वृत्तसंस्था – सोशल मीडियातील प्रसिद्ध नेटवर्किंग कंपनी व्हॉट्सअपने आपल्या युजर्सला आपले अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे. जर युजर्सनी आपले अ‍ॅप अपडेट केले नाही तर फोन हॅक होण्याची शक्यता आहे. एका स्पायवेअरमुळे असे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे व्हॅट्सअ‍ॅपने आपल्या युजर्सला अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ फोन कॉलच्या माध्यमातून हा व्हायरस कार्य़रत झाला आहे. त्याचा आपल्या खासगी माहितीवर परिणाम होऊ शकतो. एका इंग्रजी वृत्तपत्राने देलेल्या वृत्तानुसार, इस्त्राईल सायबर इंटेलिजन्स कंपनी एनएसओ कडून हा व्हायरस तयार करण्यात आला आहे. फक्त मिस कॉल दिला तरी हा स्पायवेअर फोन मध्ये जाऊ शकतो. हा बग व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑडिओ कॉल फिचरमध्ये आला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्सला अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने या व्हायरसवर नियंत्रण आणले असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे १५० कोटी युजर्स आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like