FACEBOOK PAY : नव्या सुविधेनं WhatsApp, Messenger आणि Instagram नं ‘पेमेंट’ करू शकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकने आपली पेमेंट सर्विस फेसबुक पे लॉन्च केली आहे. या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरवरुन तुम्ही पेमेंट करु शकतात. फेसबूकने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की पेमेंट करण्यासाठी यूजर्सला सिक्युरिटी पर्याय दिला जाईल, ज्यात पिन आणि बायोमेट्रिकसारखी सुविधा मिळेल. या पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून शॉपिंग, गेम, इव्हेंटचे तिकीट बुकिंग, डोनेशन किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी पैसे पाठवू शकतात.

फेसबुकने ही सर्विस सुरुवातीला यूएसमध्ये लॉन्च केली आहे. माहितीनुसार Facebook Pay कोणत्याही प्रकारचे ट्रांजॅक्शनसाठी सिंगल सिस्टम उपलब्ध करुन देईल. म्हणजेच याने युजर्सचा डाटा जसे की क्रेडिट कार्डनंबर सारखी माहिती सुरक्षित राहिलं.

ब्लॉगमध्ये सांगण्यात आले की फेसबुक पे काही प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डला सपोर्ट करेल. ज्यात PayPal सहभागी असेल. माहितीनुसार Facebook Pay, Libra Network च्या Calibra Wallet (डिजिटल करंसी) पासून वेगळे आहे. सुरुवातीला युनिफाइड पेमेंट सर्विस फक्त Facebook आणि Messenger साठी उपलब्ध करण्यात आली होती.

असे वापरता येईल Facebook Pay
1. Facebook किंवा Messenger वर फेसबुक पे चा वापर करता येईल, याआधी काही सेटिंग करावी लागेल.

2. त्यानंतर Payment Method सेलेक्ट करावा लागेल.

3. त्यानंतर पुढील ट्रांजॅक्शन करायचे असल्यास फेसबुक पे सिलेक्ट करा.

फेसबुक ने बदलला लोगो
फेसबुकने नुकतेच पेरेंट कंपनी म्हणून आपला वेगळा लोगो लॉन्च केला आहे. पेरेंट कंपनीच्या हा लोगो फेसबुक अ‍ॅपपेक्षा वेगळा आहे.

या लोगोमध्ये वापरण्यात आलेले अक्षर कॅपिटल आहेत म्हणजे ‘FACEBOOK’ असे असेल. जर तुम्ही फेसबुक मॅसेंजर अ‍ॅपच्या लोगोकडे नीट पाहालं तर त्यात facebook असे लिहिले आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like