मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात ‘Facebook’ पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून ‘चोप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वडाळ्यात मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. मुंबईतील वडाळा भागात राहणाऱ्या हिरामणी त्रिपाठी या व्यक्तीने फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात फेसबूक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर हिरमणी त्रिपाठी यांना गाठून शिवसैनिकांनी चोप दिला. एवढेच नाही तर त्यांचे मुंडण देखील केले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठाच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकाडांशी केली होती. त्यावर भाष्य करणारी आणि विरोधी पोस्ट हिरामणी यांनी फेसबुकवर केली होती. ही पोस्ट 22 डिसेंबरला करण्यात आली होती. या पोस्टवर सोशल मिडियावर देखील बराच आक्षेप घेण्यात आला होता.

दरम्यान या पोस्टमुळे वाद उफाळू नये म्हणून वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी परिसरात जमावबंदीची नोटीस जारी केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसेच वातावरण देशात पुन्हा निर्माण केले जात आहे की काय? अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/