फेसबुकने बदलले धोरण : ’लॅबमध्ये तयार झाला कोरोना’ असा दावा करणारी पोस्ट करणार नाही डिलिट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सोशल मीडियावर दररोज कोट्यवधी पोस्ट केल्या जातात, त्यापैकी काही बनावट तर काही खर्‍या असतात. सोशल मीडिया कंपन्यांसाठी बनावट पोस्ट हटवणे खुप अवघड काम आहे, मात्र, फेसबुक, ट्विटर आणि गुगल सारख्या कंपन्यांनी यासाठी काही टुल तयार केले आहेत. फेसबुक( Facebook )  वर अशा अनेक पोस्ट पडल्या आहेत ज्यांच्यामध्ये दावा केला आहे की, कोरोना व्हायरस लॅबमध्ये तयार झाला आहे. अगोदर फेसबुक अशा पोस्ट डिलिट करत होते परंतु आता फेसबुकने आपले धोरण बदलले आहे आणि अशा पोस्ट हटवण्यास मनाई केली आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की कोरोना व्हायरस मानव निर्मित आहे.

‘ही’ 8 लक्षणं सांगतात व्हिटॅमिन C ची कमतरता, डोळ्यांची दृष्टी जाण्याचा धोका; ‘हा’ आहे उपाय

द हिल ने फेसबुकच्या प्रवक्त्याच्या संदर्भाने हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. प्रवक्त्याने म्हटले की, कोरोनाच्या उत्पत्तीबाबत सुरू असलेल्या तपासात आणि एक्सपर्टच्या मतानंतर आम्ही यावर बॅन न लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही कोणत्याही अशा पोस्ट डिलिट करणार नाही ज्यामध्ये हे म्हटले आहे की, कोरोनाची उत्पत्ती लॅबमधून झाली. महामारीबाबत आम्ही आरोग्य तज्ज्ञांशी सातत्याने चर्चा करत आहोत आणि आमच्या पॉलिसीत बदल करत आहोत. यापूर्वी कोरोना लॅबमध्ये तयार झाल्याच्या पोस्ट फेसबुक चुकीच्या मानत असे आणि डिलिट करत होता.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये फेसबुकने म्हटले होते की, ते आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्या सर्व बातम्या आणि पोस्ट हटवतील ज्यामध्ये कोरोना व्हॅक्सीन बाबत चुकीची माहिती असेल. अलिकडेच कोरोनाची लॅबमधून उत्पत्तीचा रिपोर्ट समोर आला होता ज्यानंतर अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी सुद्धा गुप्तचर यंत्रणांना म्हटले होते की, त्यांनी शक्य तेवढ्या लवकर याचा शोध घ्यावा की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती कुठून आणि कशी झाली.

यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) च्या माजी प्रमुखांनी सुद्धा म्हटले होते की, आतापर्यंत जेवढे पुरावे मिळाले ते याच गोष्टीकडे इशारा करतात की, चीनच्या वुहानमध्ये एका लॅबमध्ये कोविड -19 उत्पन्न झाला होता, कारण अजूनपर्यंत या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही की, हा व्हायरस प्राणी किंवा मनुष्यात कसा आला.

Also Read this : 

केसांसाठी सर्वोत्कृष्ट कीवी हेअर मास्क, प्रत्येक समस्येपासून मुक्तता होईल; जाणून घ्या

फायद्याची गोष्ट ! रोज फक्त 1 रूपया वाचवून बनवा 15 लाखांचा फंड, जाणून घ्या

उन्हाळ्यात ‘या’ पध्दतीनं घ्या ओठांची काळजी, कधीच नाही होणार परेशानी; जाणून घ्या

.करोडपती बनण्याचा चान्स ! ‘हे’ काम करा अन् Google कडून व्हा ‘मालामाल’, 7 कोटींचं बक्षीस मिळवण्याची सुवर्णसंधी