मार्क झुकरबर्गला ‘फेसबुक’ अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – फेसबुकचे संस्‍थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्गच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. ‘फेसबुक’ या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटचा सहसंस्थापक मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. अनेक हाय प्रोफाईल घोटाळे समोर आल्यानंतर झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे.फेसबुक इंक’च्या चार मोठ्या अमेरिकन भागीदारांनी सीईओ झुकरबर्गला चेअरमनपदावरुन हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.अशा प्रकारचा प्रस्ताव २०१७ मध्ये धुडकावण्यात आला होता.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c6389b4-d2bd-11e8-8a6f-515a2439c092′]
झुकरबर्गकडे फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स आहेत. कंपनीने एप्रिल महिन्यात शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार झुकरबर्गकडे ६० टक्के समभाग आहेत , असं असून देखील त्याला पदावरुन हटवण्याची  मागणी जोर धरत आहे. काही महिन्यांपूर्वी डेटा चोरी प्रकरणी फेसबुकची जगभरात नाचक्की झाली होती. मार्क झुकरबर्गला जाहीर माफीही मागावी लागली होती.
‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ नावाच्या कंपनीने गेल्या वेळच्या अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी फेसबुकचा डेटा वापरला होता. ही गोष्ट प्रकाशझोतात आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर फेसबुकने ८.७  कोटी यूजर्सचा डेटा ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ला शेअर केल्याची कबुली दिली होती. भारत सरकारनेही कंपनीला नोटीस पाठवली होती.
[amazon_link asins=’B07417987C,B07HQJJPLK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’86b7e2f0-d2bd-11e8-9254-f5b92e5102ff’]
डेटालीक प्रकरणासारखे  घोटाळे समोर आल्यानंतर  मार्क झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे. इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंप्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगरने एकत्रितपणे हा प्रस्ताव ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झुकेरबर्ग यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर पुढील वर्षी मे महिन्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयावर गुंतवणुकदारांकडून वार्षिक बैठीकीमध्ये मतदान घेतले जाणार आहे. मात्र, अजुनही फेसबुकच्या बाजूने या विषयावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
फेसबुकच्या निर्देशक मंडळानुसार फेसबुकचे संचालकपद हे स्वतंत्र असल पाहिजे. ते कोणाच्याही अधिपत्याखाली नको. प्रस्तावामध्ये अमेरिका निवडणुकांमध्ये रशियन हस्तक्षेप, केम्ब्रिज अॅनालिटिका’  डेटा लीक अशा प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. फेसबुकच्या निर्देशक मंडळाच्या संचालकपदाच्या अनुपस्थितिमुळे फेसबुक मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी नव्या संचालकाची गरज आहे.
[amazon_link asins=’B075T1YTR9,B07C4YKR3J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98893291-d2bd-11e8-94e6-33e0107f8382′]
तसेच यापूर्वीही  झुकरबर्गला हटवण्याची  मागणी करण्यात आली होती. त्यावेळेस झुकेरबर्ग म्हणाला होता की फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने मला अजून एक संधी द्या असं म्हटलं आहे. युजर्सची माहिती त्यांची परवानगी न घेता तिस-या व्यक्तीशी शेअर करण्याची चूक माझ्या कंपनीने केली असली तरी फेसबुक चालवण्यासाठी सध्या मीच योग्य व्यक्ती असल्याचा विश्वासही झुकेरबर्गने व्यक्त केला होता.