फेसबुक युजर्सना खास भेट; रॅपर्स व्हिडीओ बनवण्यासाठी नवे बार्स अँप लॉंच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   फेसबुकने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन बार्स अँप लॉंच केले आहे. फेसबुकने बनवलेले हे अँप टिकटॉक सारखे आहे. पण हे अँप फक्त रॅपर्सना व्हिडीओ बनवण्यासाठी मदत करणार आहे. हे अँप फेसबुकच्या इंटरनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रुप एनपीईने लॉंच केले आहे. फेसबुकच्या म्युजिक श्रेणीतील हा दुसरा व्हेंचर आहे. हे अँप रॅपर्स व्हिडीओ बनवणाऱ्यांसाठी खास व्यासपीठ आहे. या अँपच्या माध्यमातून व्हिडीओ दुसऱ्या रॅपर्सना शेर करू शकता. या अँपमध्ये रॅपर्सना खास बिट्स मिळेल.

व्हिडिओसाठी मिळणार ऑडिओ व्हिज्युअल फिल्टर आणि ऑटोट्यून

फेसबुकचे आधीचे अँप कॉलाब होते, ज्याच्या मदतीने बरेच लोक एकत्र म्युजिक बनवू शकत होते, तेच या अँपद्वारे रॅपर्सनी बनवलेले रॅप इतरांना शेर करण्यासाठी मदत करेल. यामध्ये शेकडो प्रोफाइल बीट्स आहेत, जे रॅपर्स वापरू शकतात. तसेच रॅपर्स बीट्सनुसार स्वतःची गाणी लिहू शकतात. त्यानंतर रॅपर्स त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतील. या अँपमध्ये काही राइम्स सुचवल्या आहेत. त्यासोबत व्हिडिओसाठी ऑडिओ व्हिज्युअल फिल्टर आणि ऑटोट्यून मिळेल.

कॅमेरा रोलमध्ये सेव होईल ६० सेकंदपर्यंतचा व्हिडीओ

बार्स अँपमध्ये एक चॅलेंज मोड आहे, जो गेमप्रमाणे आहे. या फीचर्सच्या मदतीने रॅप बनवण्यासोबत मस्ती करू शकतील. या अँपच्या मदतीने युजर्स ६० सेकंदापर्यंतचा व्हिडीओ बनवू शकतात आणि हा व्हिडीओ कॅमेरा रोलमध्ये सेव करता येईल. या अँपमध्ये युजर्सना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेर करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे. रॅपर्सना नवीन प्रयोग करण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म देण्याचे या अँपचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोना महामारीमुळे रखडलेले संगीताचे काम पुन्हा सुरु राहतील.