खुशखबर ! आता फेसबुक देणार पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुम्ही सोशल मिडीयाचा वापर करून पैसे कमावू इच्छित आहात तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता फेसबुकने युझर्सना पैसे कमावण्याची संधी दिली आहे. फेसबुकने एक असे अ‍ॅप लाँच केले आहे की ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुक युजर्सना पैसे देईल. पैशाच्या बदल्यात युझर्सना त्यांची स्वतःची वैयक्तिक माहिती फेसबुकला शेअर करावी लागणार आहे. या अ‍ॅपचे नाव फेसबुकने ‘स्टडी’ असे ठेवले आहे. स्टडी नावाचे हे अ‍ॅपआधीच्या दोन्ही अ‍ॅपपेक्षा वेगळे आहे. हे अ‍ॅप फक्त गुगल प्ले स्टोअरवरूनच डाऊनलोड करता येऊ शकते. भविष्यात हे अ‍ॅप  ऍपल स्टोअरवर देखील लाँच करण्यात येईल.

कसे काम करणार हे अ‍ॅप

या अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुक युझर्सच्या उपक्रमावर नजर ठेवेल. या अ‍ॅपच्या माध्यमातून युझर्स कोणते कोणते दुसरे अ‍ॅप वापरत आहे याची नोंद फेसबुककडून ठेवण्यात येईल. कोणता अ‍ॅपवर युझर्स किती वेळ घालवत आहे, याची देखील माहिती फेसबुक ठेवेल.

गुप्ततेच्या प्रश्नावर फेसबुकने सांगितले की, हे अ‍ॅप कोणत्याही युझर्सच्या खात्याची आणि पासवर्डची माहिती घेणार नाही. हे अ‍ॅप वेळोवेळी युझर्सचा डेटा घेत असल्याची माहिती देईल. हे अ‍ॅप १८ वर्षापेक्षा जास्त वय असणारे लोकच डाऊनलोड करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनी युझर्सना किती पैसे देईल हे जाहीर करण्यात आलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?