मोबाइल रिचार्ज करा फेसबुकवरून

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
सोशल नेटवर्किंग साईटवर आता देता किती सुरक्षित आहे याऐवजी किती नवी फीचर्स देता येतील याकडे लक्ष लागले आहे. यापैकी एक म्हणजे फेसबुक वरून आता मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर फोनवर उपलब्ध आहे. फेसबुकच्या मोबाइल रिचार्ज या फीचर वरून कोणत्याही कंपनीचे रिचार्ज एका क्षणात करता येणार आहे.
आयफोन युजर्सना मात्र हे फिचर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. हे फीचर आयओएस आणि डेस्कटॉपवर देखील लवकरच मिळणार असून लवकरच पोस्टपेड बिल भरण्याची देखील सोय दिली जाणार आहे.

असे करा रिचार्ज:
हे फिकर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून फेसबुकचे नवीन अँप डाउनलोड करावे. त्यानंतर त्यावर मोबाइल रिचार्जचा पर्याय उपलब्ध होईल.

 • * नवीन फीचरसाठी हॅम्बर्गर आयकॉनवर क्लिक करा
 • मोबाईल रिचार्जचा पर्याय निवडा किंवा काही व्हर्जनमध्ये मोबाईल टॉप-अप नावाने हा पर्याय असेल.
  * स्क्रीनवर मोबाईल रिचार्जचा पर्याय न दिसल्यास See More option मध्ये जाऊन पाहावा.
  * मोबाइल रिचार्ज पर्यायावर क्लिक केल्यांनतर फेसबुकवर वेलकम स्क्रीन दिसेल.
  * यानंतर तुम्हाला क्रेडिट/ डेबिट कार्डाचा पर्याय विचारेल.
  * क्रेडिट अथवा डेबिट पर्यायानंतर ‘रिचार्ज नाउ’वर क्लिक करावे.
  * यानंतर मोबाईल फोन नंबर विचारला जाईल. तसेच मोबाईल ऑपरेटरची निवड करायची किंवा फेसबुक स्वतः नंबरवरून योग्य ऑपरेटरची निवड करेल.
  * नंतर किती रुपयांचे रिचार्ज आणि कोणता पॅक उपलब्ध आहे ते दाखवले जाईल.

सर्व पर्यायांची निवड केल्यांनतर पेमेंट करण्यासाठी विचारले जाईल. यात आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा तपशील विचारला जाईल. अखेर ‘प्लेस आर्डर’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर रिचार्ज होईल. सध्या डेबिट किंवा क्रेडिटच्या माध्यमातूनच रिचार्ज करता येणार असल्याने पेमेंटसाठी इतर कोणत्याही वॉलेटला हे जोडता येणार नाही.