‘लॉकडाऊन’मधील सर्वात मोठी ‘डील’ ! ‘फेसबुक’ 9.99% ‘भागीदारी’साठी जिओमध्ये करणार 43,574 कोटींची ‘गुंतवणूक’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्मवर मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की फेसबुक जिओ प्लॅटफॉर्मवर 9.99 टक्के भाग  भांडवलासाठी 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. बुधवारी झालेल्या या मोठ्या करारानंतर फेसबुक आता जिओ कंपनीचा सर्वात मोठा शेअरधारक बनला आहे. या गुंतवणूकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे एंटरप्राइझ मूल्य आता वाढून 4.62 लाख कोटींवर गेले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हा करार, 43,574 कोटी (5.7 अरब डॉलर्स) रुपयांचा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम नेटवर्क जिओमध्ये जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा 100% हिस्सा आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड आणि फेसबुकने जियो प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकद्वारे 43574 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे वचन दिले आहे. या करारामध्ये जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्य 4.62 लाख कोटी रुपये ( 65.95 अरब डॉलर्स) आहे.

अशाप्रकारे जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकचा वाटा 9.99 टक्के असेल. या करारानंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये लहान भागधारकांच्या श्रेणीमध्ये फेसबुकचा सर्वात मोठा वाटा असेल.

फेसबुक म्हणाले, ‘ही गुंतवणूक भारताबद्दलची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. जिओने भारतात आणलेल्या मोठ्या बदलांमुळे आम्हीही उत्साहित होतो. चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत रिलायन्स जिओने सुमारे 38 कोटीपेक्षा अधिक लोकांना ऑनलाइन व्यासपीठावर आणले आहे. म्हणूनच आम्ही जिओच्या माध्यमातून भारतातील अधिकाधिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी वचनबद्ध आहोत.’