फेसबूक EssilorLuxottica च्या मदतीनं 2021 मध्ये लॉन्च करणार ‘स्मार्ट ग्लासेस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   फेसबूकचे सीईओ मार्क झुकबर्ग यांनी आपल्या नव्या प्रोडक्टची घोषणा केली आहे. फेसबूक आता लवकरच त्यांचे पहिले स्मार्ट ग्लासेस घेऊन येण्याच्या तयारीमध्ये असल्याचे खुद्द मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. याबाबतची घोषणा काल करण्यात आली आहे. यासाठी फेसबूक कंपनीने EssilorLuxottica सोबत करार केला आहे.

EssilorLuxottica ही कंपनी रेबान, Oakley चे ग्लासेस बनवण्याचे काम करते. आता त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत फेसबूक आपल्या पहिल्या स्मार्ट ग्लासेसची निर्मिती करणार आहे. फेसबुकचे हे स्मार्ट ग्लासेस पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये लॉन्च केले जाणार आहेत. याबाबतची घोषणा मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी (दि.16) केली. ही घोषणा व्हर्च्युअल फेसबूक कनेक्टमध्ये करण्यात आली.मार्क झुकरबर्ग म्हणाले, माझ्याकडे सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी कोणतेही प्रोडक्ट सध्यातरी उपलब्ध नाही. पण 2021 मध्ये स्मार्ट ग्लास लॉन्च करण्याचा मानस आहे. त्यासाठी मल्टी लेअर पार्टनशिप केली असल्याची माहिती मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

 

Ray-Ban ब्रॅन्डेड हे ग्लास अद्यावत तंत्रज्ञान आणि फॅशनेबल असतील. युजर्सना त्यांच्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत त्यांच्यामुळे अधिक प्रभावीपणे कनेक्ट होता येणार आहे. दरम्यान, या ग्लासेसची अधिक माहिती, किंमत प्रॉडक्टचं नाव हे 2021 मध्ये लॉन्च करण्यापूर्वी काही वेळ आधी सांगितलं जाणार आहे. फेसबूककडून त्यांच्या नव्या प्रोडक्टबद्दल अधिक विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच EssilorLuxottica सारख्या कंपनीसोबत मिळून काम करण्याचा आनंद आहे असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकांना तंत्रज्ञानाचा वापर करुन नवा अनुभव देण्यासाठी आम्ही देखील उत्साही आहोत असे फेसबूककडून सांगण्यात आले आहे. सध्या गुगल ग्लासेस, भारतामध्ये जिओ ग्लासेस उपलब्ध आहेत. यांदाच्या रिलायंस वार्षिक बैठकीत जिओ ग्लासेसची घोषणा करण्यात आली होती.