50 कोटी FB यूजर्सचे फोन नंबर विकले जाताहेत टेलीग्रामवर

नवी दिल्ली : फेसबुकशी डेटा ब्रीचचे नाते जुने आहे. वेळोवेळी फेसबुकवरून कोणता ना कोणता डेटा लीक होत असतो. वृत्त आहे की, 500 मिलियन फेसबुक यूजर्सचे फोन नंबर टेलीग्रामवर बॉटच्या द्वारे विकले जात आहेत.

सिक्युरिटी रिसर्चरचा दावा आहे की, टेलीग्राम बॉटकडे जवळपास 500 मिलियन यूजर्सचे फोन नंबर आहेत. ही माहिती 2019 मध्ये फेसबुकच्या त्रुटीमुळे लीक झालेल्या डेटाचाच एक भाग आहे.

सिक्युरिटी रिसर्चर ज्यांनी टेलीग्रामवर बॉट बनवले आहे, त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे त्या डेटाबेसचा अ‍ॅक्सेस आहे ज्यामध्ये 500 मिलियन फेसबुक यूजर्सचे फोन नंबर आहेत. त्यांनी लिहिले आहे 2020 च्या सुरुवातीला फेसबुकच्या एका त्रुटीबाबत समजले होते.

फेसबुकच्या या त्रुटीमुळे लोकांचे फेसबुकवर लिंक्ड फोन नंबर एक्स्पोज होत होते. आता हे फोन नंबर टेलीग्राम बॉटद्वारे अतिशय कमी किंमतीत विकले जात आहेत.

मदरबोर्डच्या एका रिपोर्टनुसार, टेलीग्रामचा हा बॉट फेसबुक आयडीच्या द्वारे यूजर्सचा फोन नंबर सांगत आहे, ज्यांचा नंबर फेसबुक डेटा ब्रीचमध्ये लीक झाला आहे. मात्र, यासाठी बॉटला 20 डॉलर सुद्धा द्यावे लागतील. कारण टेलीग्राम बॉट फोन नंबर बल्कमध्ये देत आहे.

सिक्युरिटी रिसर्चरचे म्हणणे आहे की, हा इतक्या साइजचा डेटाबेस सायबर क्राइम कम्युनिटीजमध्ये विकला जात आहे, जो लोकांची प्रायव्हसीसाठी धोका आहे. हा फ्रॉड अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सायबर क्रिमिनल्स यूज करू शकतात.