भारतासह जगभरात फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम गंडले ; व्हिडीओ, फोटो अपलोड करण्यात अडचण

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या सोशलमिडियात थोडाही बिघाड झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसतात. अगदी त्याचाच प्रत्यय बुधवारी दिनांक ३ जुलै रोजी आला आहे. इंटरनेटच्या महाजालातील सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स काही काळासाठी डाऊन झाले होते. या तिन्ही ठिकाणी फोटो, व्हिडीओ अपलोड करताना युजर्सना अडचणी येत होत्या. भारतासह जगभरात या समस्येला तोंड द्यावे लागले. मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया या देशात हे अडथळे जाणवले. ट्विटरवर याविषयी मोहिमा देखील चालविण्यात आल्या.

सोशल मीडियाच्या व्यासपीठावर संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही तिन्ही महत्त्वाची माध्यमं एकाच वेळी डाऊन झाल्यानं युजर्सची कोंडी झाली आहे. याचे पडसाद ट्विटरही उमटले आहेत. याचा परिणाम ट्विटरवर दिसून आला. फेसबुक, इंस्टाग्राम,व्हॉट्सअप वापरणाऱ्या युजरनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला. असून #whatsappdown #instagramdown #facebookdown हे तिन्ही हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहेत. काही युजरनी ट्विटरवरून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ची खिल्ली उडविली. याप्रकरणी फेसबुककडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

You might also like