देशात इंटरनेट मीडिया कंपन्या बंद होण्याच्या वृत्तादरम्यान Facebook चे मोठे वक्तव्य, म्हटले – ‘मानणार नियम’

नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या सर्व परदेशी इंटरनेट मीडिया कंपन्यांसाठी ठरवलेल्या नियमांचे पालन करण्याची डेडलाईन जवळ आली असतानाच याबाबतीत फेसबुकचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. कंपनीने म्हटले की, आम्ही आयटी नियमांच्या तरतुदींची पालन करू आणि काही मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले की, आमचे लक्ष्य आयटी नियमांच्या तरतुदींचे पालन करणे आहे आणि काही मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवणे आहे ज्यासाठी सरकारसोबत चर्चा करण्याची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना फेब्रुवारीमध्ये काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी कंपन्यांना तीन महिन्यांचा वेळ दिला होता, ज्याचा कालावधी 26 मे रोजी पूर्ण होत आहे. या कंपन्यांनी अजूनपर्यंत केंद्राच्या नियमांचे पालन केलेले नाही, ज्यामुळे यांची सेवा देशात बंद होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

केंद्र सरकारद्वारे 25 फेब्रुवारी 2021 ला देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून डिजिटल कंटेंट रेग्यूलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत ग्रीव्हन्स ऑफिसर, कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याची सक्ती केली होती आणि या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असावे असे म्हटले होते. केंद्राकडून देण्यात आलेल्या आदेशांतर्गत कंपन्यांना कम्प्लायन्स अधिकार्‍याची नियुक्ती करावी लागेल आणि त्यांचे नाव आणि कॉन्टॅक्ट अ‍ॅड्रेस भारतातील असायला हवा, 15 दिवसाच्या आत तक्रारीचे निवारण करण्याची व्यवस्था, आक्षेपार्ह पोस्टची देखरेख, सारख्या सामान्य व्यवस्था अशा नव्या गोष्टी नवीन नियमात आहेत.

नवीन नियमांनुसार, इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मला सरकारच्या निर्देश किंवा कायदेशीर आदेशानंतर 36 तासांच्या आत आक्षेपार्ह साहित्य हटवावे लागेल. नवीन नियमात म्हटले आहे की, सोशल मीडिया मध्यस्थसाह सर्व मध्यस्थांना यूजर्स किंवा पीडिताकडून तक्रारी प्राप्त करणे किंवा त्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण तंत्र स्थापन केले पाहिजे. केवळ घरगुती मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू ने नवीन आयटी नियम 2021 चे पालन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. कू ने म्हटले की, त्यांनी एक भारतीय निवासी चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल अधिकारी आणि ग्रीव्हन्स अधिकारीद्वारे एक तक्रार निवारण व्यवस्था सुद्धा लागू केली आहे.