यापुढे Facebook Messenger वर दिसणार नाही ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Facebook Massanger च्या स्कॅन कोडच्या माध्यमातून कोणाच्याही प्रोफाइलपर्यंत पोहोचू शकता येत. मात्र, Facebook Massanger मधलं हे फिचर ऑगस्ट 2019 पासून बंद होणार आहे. याबाबत फेसबुकने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर माहिती दिली आहे.

फेसबुकने डेव्हलपर वेबसाइटवर माहिती देताना सांगितले आहे की, १५ ऑगस्ट २०१९ पासून Facebook Massanger ला स्कॅनिंग मॅसेजिंग कोड्स हे फिचर सपोर्ट करणार नाही. त्याऐवजी युजर्स QR कोडचा वापर करू शकतात . QR कोड फीचर हे स्कॅन कोडपेक्षा वापरायला सुद्धा सोपं आहे. QR कोड या फीचरच्या माध्यमातून युजर स्कॅनच्या नवीन कॉन्टॅक्टसोबत जोडले जाणार आहोत. तसेच युजरला कॉन्टॅक्टही क्यूआर कोडने शेअर करता येईल.

या कारणामुळे करणार स्कॅन कोड बंद
अनेक फोनमध्ये मॅसेंजर कोड डिटेक्ट करण्यास युजर्सना अडचणी येतात.
मॅसेंजर कोड स्कॅनिंग ही एक लांबलचक प्रोसेस आहे. जी ४ स्टेप्समध्ये पूर्ण करावी लागते.
स्कॅन रिडर हे फिचर फेसबुकवर आधीपासूनच आहे. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी आधी फेसबुकच ओपन करावं लागतं.
याशिवाय अनेक युजर्स असेही आहेत ज्यांना फेसबुक मॅसेंजरमध्ये Scan code हे ऑप्शन देखील माहित नाही.

सोशल नेटवर्किंग साईटस पैकी फेसबुक लोकप्रिय आहे.फेसबुकच्या युजर्स संख्येत चांगलीच वाढ होत असून ८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जगभरात २. ३८ अब्जाहून अधिकजण फेसबुकचा वापर करत आहेत. त्याशिवाय सुमारे ५० कोटी युजर्स फेसबुक स्टोरीज फीचर्स वापरत आहेत.