Coronavirus : ‘कोरेाना’ संकटादरम्यानच कर्मचार्‍यांना मदतीसाठी Facebook देणार 1000 डॉलर ‘बोनस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –अ‍ॅपल, गुगल, ट्विटर आणि फेसबुक यासारख्या असंख्य कंपन्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, फेसबुकने एक मोठी घोषणा केली आहे. घरातून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना फेसबुक 1 हजार डॉलर म्हणजे जवळपास 74 हजार रुपयाचा बोनस देणार आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात मंदीची शक्यता असताना फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकमध्ये जवळपास 45 हजार फुल टाईम कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्याचबरोबर काही कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आहे.

झुकरबर्ग यांनी पाठवलेल्या मेलमध्ये कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या छोट्या व्यावसायिकांना मदत म्हणून 30 देशांतील 30 हजार छोट्या व्यावसायिकांना 741 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. फेसबुकच्या 16 वर्षाच्या इतिहासात अस पहिल्यांदाच घडले आहे. जे की कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देत आहे, असे एका पत्रकाराने म्हटले आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे फेसबुकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंपनीचे 28 टक्क्यांपेक्षा अधिक शेअरमध्ये घसरण झाली आहे.

फेसबुकने नुकतेच एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान होताच आपले सिंगापूर आणि लंडन मधील कार्यालय बंद केले आहे. फेसबुकने हे दोन्ही कार्यालय साफसफाईसाठी बंद केले आहेत. ज्या कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तो कर्मचारी 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान लंडन कार्यालयात गेला होता.