जोडीदार शोधताय? Facebook चं नवं डेटिंग अ‍ॅप लॉन्च होणार; चॅट ऐवजी थेट व्हिडीओ कॉलही करू शकता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रत्येक व्यक्तीला एका जोडीदाराची गरज असते. त्या जोडीदारासोबत सवांद साधने, मनमोकळे होणे त्या जोडीदाराच्या सहकाऱ्याने संगतीने अनेक गोष्टी शेअर करत असतो. तर अनेक संकटे किंवा समस्या समोर येत असतात त्यावर उपाय अथवा मार्ग काढण्यासाठी जोडीदाराची आवश्यकता असते. म्हणून एकट्या असणाऱ्या व्यक्ती ह्या जोडीदार शोधण्याच्या प्रवासात असतात. यामध्ये अयोग्य असं काही नाही. या माध्यमातून अनेक व्यक्तीसाठी एक महत्वपूर्ण आणि सोपा मार्ग आलेला आहे. यावरून Facebook लवकरच एक नवीन Dating app लॉन्च करत आहे. या अ‍ॅपद्वारे व्यक्ती आपला जोडीदार शोधू शकता येणार आहे. तसेच, जोडीदारासोबत डेंटला सुद्धा जाऊ शकणार आहे. जाणून घ्या

‘हे’ अ‍ॅप आणणार Facebook?

Facebook आता नवीन Speed dating app ची चाचणी करत आहे. या अ‍ॅपचं नाव Sperked असं आहे. या अ‍ॅपला Facebook ची In-house team अर्थात NPE ने तयार केलं आहे. परंतु हे अ‍ॅप Facebook dating पेक्षाही अनोळख आहे. या अ‍ॅपमध्ये व्यक्तीला Facebook प्रोफाईलद्वारे अकाउंट तयार करावं लागणार आहे. सध्या या अ‍ॅपची चाचणी सुरु आहे. ‘द वर्ज’ने या डेटिंग अ‍ॅपबद्दल स्पष्ट केलं आहे. तसेच द वर्जच्या माहितीनुसार या अ‍ॅपच्या वेबपेजविषयी माहिती देण्यात आली आहे. चांगल्या व्यक्तीसोबत Video dating, असं या अ‍ॅपबाबत लिहिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. हे डेटिंग अ‍ॅप Bumble, Tinder, Hingeआणि अन्य अ‍ॅपच्या तुलनेत वेगळं आहे. या नवीन अ‍ॅपमध्ये व्यक्तीला Swipe right किंवा लेफ्टचं पर्याय मिळणार नाही. दुसरीकडे या अ‍ॅपसाठी Facebook व्यक्तीकडून पैसे घेणार नाही. विनाशुल्क असं हे अ‍ॅप तयार होत आहे.

काय आहे या अ‍ॅपमध्ये ?

व्यक्तीची मते किंवा मन एखाद्या व्यक्तीबरोबर जुळत असेल तर त्या व्यक्तीसोबत चॅट करु शकणार नाही. डायरेक्ट व्हिडीओ कॉल करुन व्हिडीओ डेटला जाल. हा व्हिडीओ ४ मिनिटांचा असणार आहे. म्हणजेच व्यक्तीचा पहिला डेट हा केवळ ४ मिनिटांचा असणार आहे. परंतु या ४ मिनिटात व्यक्तीचे अन्य व्यक्तीसोबत मन जुळले तर दुसऱ्यावेळी १० मिनिटांचा व्हिडीओ कॉल करु शकता.

म्हणतं केवळ चांगल्या व्यक्तीलाच जागा –

या अ‍ॅपमध्ये Video dating, करताना व्यक्तीचा स्वत:चा मोबाईल क्रमांक, पत्ता देखील शेअर करु शकणार आहात. परंतु, हे सर्व जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. कारण ज्यांची प्रोफाईल चांगली नाही किंवा संशियत वाटणारी असेल अशा लोकांना या डेटिंग अ‍ॅपवर अजिबात जागा नाही. जेव्हा व्यक्ती प्रोफाईल तयार करेल तेव्हा अनेक प्रश्न विचारले जातील. त्या आधारावरच व्यक्तीला या डेटिंग अ‍ॅपमध्ये जागा मिळणार आहे.

प्रोफाईल तयार करताना हे प्रश्न विचारले जाणार –

फ्तत्तम पायरीनुसार व्यक्तीला त्याच्यातील चांगल्या गोष्टी विचारल्या जाणार. व्यक्ती किती चांगले डेटर आहात याची माहिती विचारली जाईल. त्यानंतर १ व्यक्ती तुमचा पुनरावलोकन घेईल त्यानंतरच त्याला डेटिंग अ‍ॅपवर जुळता येणार आहे. यावेळी , एक महत्त्वाचा विषय आहे. स्वाईप लेफ्ट किंवा राईटचा ऑप्शन नसताना वापरकर्ते परस्परांस कसे मॅच करु शकतात? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. याव्यातिरिक्त Facebook ने या अ‍ॅपच्या प्रायव्हसीबाबत काहीच माहिती दिली नाही. एखाद्यावेळेस हे अ‍ॅप तयार केल्यावर याबाबत माहिती दिली जाईल.