फेसबुकवरची मैत्री पडली महागात, नोकरीच्या अमिषाने महिलेवर बलात्कार

अंबाला : हरियाणा वृत्तसंस्था
फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मित्राने मैत्रीचा फायदा घेऊन एका ३० वर्षाच्या महिलेला नोकरीचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील अंबाला शहरात घडली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी राहुल (वय -२९) विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ३० वर्षीय महिलेने फिर्य़ाद दिली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षितेतबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर आरोपी राहुलनं महिलेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0109b36f-b982-11e8-baf2-67ae07c4d954′]
एकेदिवशी तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि अश्लिल व्हिडीओ बनवल्याचा आरोप राहुलवर करण्यात आला आहे. पीडित महिलेचा अश्लिल व्हिडीओ बवनून आरोपी वारंवार तिला धमकावत होता. पीडित महिलेनं पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीसोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. यादरम्यान त्यानं चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर त्यानं भेटायला बोलावून पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली व शुद्ध आल्यानंतर अंगावर एकही वस्त्र नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिला जबर धक्का बसला. काही दिवसांनंतर आरोपी महिलेच्या घरी पोहोचला व पाच लाख रुपये रोख देण्याची मागणी करत तिचा बनवलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं 27 जूनला पीडित महिलेला जीरकपूरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिला तेथे डांबून ठेवले. यानंतर तिच्यावर अत्याचार केले.
[amazon_link asins=’B01J82IYLW,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0fc73298-b982-11e8-abce-fb9766a869da’]