फेसबुकचा पुन्हा गोंधळ

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

जगभरात लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्कीग साईट फेसबुकवरील युजर्सची खासगी माहिती केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीनं चोरल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे. फेसबुकने गुरुवारी (७ जून) सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळामुळे १४ मिलियन युजर्सचा खासगी डेटा सार्वजनिक झाला होता. याबाबत फेसबुकनं माफीदेखील मागितली आहे. १८ मे ते २७ मे या कालावधीदरम्यान हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.