फेसबुकचं नविन पेज; चांगल्या आठवणी करा आता जतन

वृत्तसंस्था :

फेसबुक चे नविन फिचर आले असुन, आता वापरकर्त्याला त्यांच्या जुन्या आठवणी पोस्ट करता येणार आहे. याआधी फेसबुक ने ‘On This Day’ हे फीचर आणले होते. यामध्ये एखादि जुनी पोस्ट त्या त्या दिवशी वापरकर्च्याला परत शेअर करता येते. मात्र नविन बदलानुसार जुन्या पोस्ट म्हणजेच आठवणी वापरकर्त्याला साठवुन ठेवता येणार आहे. यासाठी वेगळं पेज वारकर्त्याला त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर उपलब्ध होणार आहे. डेटा लिक प्रकरणानतंर फेसबुकला याचा चांगलाच फटका बसला होता. यावेळी ‘डिलिट फेसबुक’ सारख्या मोहिमही फेसबुक विरोधात राबवल्या गेली होती. त्यामुळे याचा परिणाम फेसबुक ला भोगावा लागला. दरम्यान वारकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी फेसबुक हे बदल करताना दिसुन येत आहे.

चांगल्या आठवणींचा लेखाजोखा मांडणाऱ्या नव्या फीचर्सची घोषणा फेसबुकने केली आहे. यामध्ये फेसबुक वापरकर्त्याला चांगल्या आठवणी जतन करता येणार आहे. यासाठी एक नविन पेज फेसबुक अकाऊंटवर उपलब्ध होणार आहे. याआधी On This Day च्या माध्यमातून त्या त्या दिवशी भूतकाळात शेअर केलेल्या जुन्या पोस्ट त्यांच्या पेजवर शेअर करता येतात. अनेकांना हे फीचर आवडलं होते.याचा विचार करत फेसबुक ने जुन्या आठवणींचं लेखाजोखे हे वेगळं पेज तयार केलं आहे. यामध्ये जुन्या पोस्ट वापरकर्त्याला कधीही या पेजवर जाऊन त्या बघता येणार आहेत.फेसबुक च्या नविन फीचरमुळे वापरकर्त्याला त्यांच्या जुन्या आठवणी या पेज च्या माध्यमातून आता बघता येणार आहे. अशी घोषणा आज फेसबुकने केली आहे.