Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या मेसेंजर अपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.
Remove for everyone’ आणि ‘Remove for you’ हे असतील option –

 Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुकवरील अनावश्यक मेसेज डिलिट करता यावेत यासाठी फेसबुकने नवीन फीचर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मेसेज डिलिट करण्यासाठी ‘Remove for everyone’ आणि ‘Remove for you’ अशा दोन पर्यायाचा समावेश फेसबुक करणार आहे.
Whatsapp वर सध्या एका तासात मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे. परंतु, फेसबुकवर किती वेळ अशी सुविधा देण्यात येणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. फेसबुक आपल्या मेसेंजरॲपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे.    एका युजरने याचा स्क्रीनशॉट रेडिटवर शेअर केला आहे. ॲन्ड्रॉइड मेसेंजर ॲपमध्ये डार्क मोड फीचरची चाचणी करण्यात येत आहे.