गुडघे आणि कोपऱ्याच्या काळेपणाची लाज वाटते का? तर एकदाच करून पाहा हे घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. बहुतेक मुलींना या हंगामात स्लीवलेस किंवा शॉर्टड्रेस घालायला आवडते. परंतु, कधीकधी कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणामुळे त्यांना लाज वाटते. काही मुली यामुळे आपला आवडता ड्रेस घालू शकत नाही. जर आपणही कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी महागड्या क्रिम, स्क्रबचा वापर करुन कंटाळला असाल तर एकदा घरच्या घरी उपाय करून पहा ज्यामुळे काही दिवसात गुडघे आणि कोपऱ्याचा काळपटपणा दूर होईल आणि तुम्ही तुमचा आवडता ड्रेसही घालू शकाल.

काळेपणा प्रथम का येतो हे जाणून घ्या

त्वचेत मेलेनिनची पातळी कमी झाल्यामुळे गुडघे आणि कोपरे काळे होतात. याशिवाय सूर्यप्रकाशामुळे, मृत त्वचा, हार्मोनल असंतुलन यामुळे शरीराचे काही भाग काळे पडतात.

काळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय …

१) कढीपत्ता

८-१० कढीपत्ता बारीक करून त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. १०-१५ मिनिटांसाठी गुडघे आणि कोपरांवर लावा आणि नंतर थंड पाण्याने किंवा गुलाबाच्या पाण्याने धुवा. यानंतर मॉइश्चरायझर लावा. कढीपत्त्यात असलेले औषधी गुणधर्म काळेपणा दूर करण्यास मदत करतात.

२) काकडी

काकडीचे तुकडे कोपर आणि गुडघ्यावर १०-१५ मिनिटे घासून घ्या आणि नंतर त्यांना ५-१० मिनिटे तसेच सोडा. यानंतर पाण्याने स्वच्छ करा. आपण अंघोळ करण्यापूर्वी देखील हे करू शकता. यामुळे गुडघे आणि कोपरांचा काळपटपणा दूर होईल.

३) लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू कापून त्यावर बेकिंग सोडा लावा. यानंतर गुडघे आणि कोपरांना मालिश करा आणि १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. दररोज असे केल्याने आपल्याला स्वतःहून फरक जाणवेल.

४) दूध आणि कोरफड

२ चमचे दुधात २ चमचे कोरफड जेल चांगले मिसळा. याने कोपर आणि गुडघ्यांना मालिश करा आणि रात्रभर तसेच सोडा. सकाळी पाण्याने धुवा. नियमितपणे हे केल्याने आपल्याला स्वतःहून फरक जाणवेल.

५) हळद

एका भांड्यात ३ चमचे हळद, १ चमचा मध आणि २ चमचे दूध मिसळा. हे मिश्रण कोपर आणि गुडघ्यावर २० मिनिटे लावल्यानंतर पाण्याने धुवा.

६) डाळीचे पीठ

कढीपत्ता बारीक करा. त्यात एक चमचा हळद, थोडेसे दूध मिसळा आणि जाड मिश्रण तयार करा. आता ते प्रभावित ठिकाणी १०-१२ मिनिटांसाठी लावा आणि पाण्याने धुवा.