×
Homeताज्या बातम्याFacial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass,...

Facial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass, मार्च 2022 पासून पुण्याच्या लोहगाव विमानतळासह 4 ठिकाणी सुरू होईल FRT System

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Facial Recognition Technology (FRT) | देशात लवकरच विमातळावर (Airport) केवळ चेहरा दाखवल्याने प्रवेश आणि निर्गमन (Entry and Exit Point) पासून बोर्डिंग पास (Boarding Pass) पर्यंतच्या सुविधा मिळतील. गुरुवारी नागरी उड्डयन राज्यमंत्री (Minister of State for Civil Aviation) जनरल व्ही.के. सिंह (General V.K. Singh) यांनी लोकसभेत (Lok Sabha) सांगितले की, भारतात चार विमानतळांवर (वाराणसी-Varanasi, पुणे-Lohegaon Airport Pune, कोलकाता-Kolkata आणि विजयवाडा- Vijayawada) डिजी प्रवासाच्या (Digi Travel) पहिल्या टप्प्यात लवकरच चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (FRT System) लावले जाईल. Facial Recognition Technology (FRT)

 

सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) एफआरटी आधारित बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टम (Biometric Boarding System) च्या योजनेवर काम करत आहे. त्यांनी सांगितले की, प्रस्तावित डिजी प्रवास सेंट्रल इको-सिस्टम (Digi Travel Central Ecosystem) मार्च 2022 मध्ये लाइव्ह करण्याची योजना आहे. चार विमानतळांवर मशीन्स लावल्यानंतर विविध विमानतळांवर सुद्धा हे तंत्रज्ञान आवलंबले जाईल. (Facial Recognition Technology (FRT))

 

खासदार वरुण गांधी आणि रामशंकर कठेरिया (MP Varun Gandhi and Ramshankar Katheria)
यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सिंह यांनी सांगितले की, प्रवाशांच्या डाटाच्या सुरक्षेसाठी डिजी प्रवास सेंट्रल इकोसिस्टमसाठी नोंदणी करणे प्रवाशांसाठी ऐच्छिक असेल.

 

कशी काम करते FRT System

तज्ज्ञांनुसार, प्रवाशांचा चेहरा एकदा डिजी प्रवास सिस्टमने नोंदणी केल्यानंतर
त्यांना विमानतळात प्रवेश करताना ओळखपत्र दाखवण्याची आवश्यकता असणार नाही.
टर्मिनलमध्ये प्रवाशाने प्रवेश करताच एअरलाईन्स कंपनीला प्रवासी आल्याची माहिती मिळेल.
यानंतर सिस्टमद्वारे प्रवाशाचा बोर्डिंग पाससुद्धा थेट त्याच्या फोनमध्ये पाठवला जाईल.

 

Web Title :- Facial Recognition Technology (FRT) | boarding pass airports will soon be made just by showing face frt system will start at Lohegaon Airport Pune as well as varanasi, kolkata and vijaywada in march 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

Kane Williamson | केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता ! 66 वर्षांनंतर ‘रेकॉर्ड’?

Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हेंची थेट मोर्दीवर टीका; म्हणाले – ’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’

Home Loan ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, छोटी चूक सुद्धा पडू शकते महागात; जाणून घ्या

Pune Police Inspector Promotion List | पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि CID मधील 34 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त – ACP / पोलिस उप अधीक्षक – DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News