चहा पिऊन कोरोना रोखता येऊ शकतो का? जाणून घ्या या दाव्यातील ‘सत्य’ता

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. या आजाराशी लढण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे, परंतु कोरोनाबाबत अनेक बनावट बातम्या सुद्धा सोशल मीडियावर वायरल होत आहेत. अशाच एका फेक न्यूजमध्ये दावा करण्यात येत आहे की, चहा प्यायल्याने कोरोना संसर्ग रोखता येऊ शकतो.

सोशल मीडियावर या बातमीची जी क्लिप शेयर केली जात आहे, तिचे शीर्षक आहे ’खूप चहा प्या आणि पाजा, चहा पिणार्‍यांसाठी खुशखबर’. या फेक न्यूजमध्ये म्हटले आहे की, जर कुणी दिवसात तीन वेळा चहा पित असेल तर तो कोरोना संक्रमित होणार नाही.

बातमीत एक दावा करण्यात आला आहे की, चहा प्यायल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखता येऊ शकतो आणि यातून संक्रमित व्यक्ती लवकर बरी सुद्धा होऊ शकते.

भारत सरकारचे ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा बनावट असल्याचे म्हटले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा दावा बनावट असून यास कोणताही शास्त्रीय आधार नाही.

तसेच एका बनावट बातमीत दावा करण्यात येत आहे की, खाण्याच्या पानांचे सेवन केल्यास कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो तसेच संक्रमित व्यक्तीसुद्धा बरा होऊ शकतो.

पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा सुद्धा बनावट असल्याचे शनिवारी सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले की, हा दावा चुकीचा असून कोविड-19 पासून बचावासाठी वारंवार हात धुणे, मास्क लावणे आणि शरीरीक अंतर पाळणे आवश्यक आहे.