Fact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी सरकारच्या ‘या’ 2 योजनांचा लाभ मिळणार नाही ? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत विम्याचा लाभ मिळणार नाही असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पीआयबी फॅक्टचेकनुसार, पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अतंर्गत संबंधितांना विमा मिळत नाही. पंरतु पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत काही विशिष्ठ अटींसह कोरोनाच्या मृत्यूचा समावेश आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काय आहे. या मेसेजमध्ये लिहिलंय की, जर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू कोरोना किंवा इतर अन्य कारणामुळं झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीच्या पासबुक अकाऊंटवर 12 रुपये आणि 330 रुपये व्यवहाराची एन्ट्री चेक करावी आणि विम्यासाठी दावा करावा.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी 330 रुपये आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी 12 वर्षाला बँक अकाऊंटमधून जातात. त्या व्यक्तींना सरकारकडून 2 लाखांची विमा सुरक्षा दिला जाते. त्यामुळं जर कोरोनामुळं मृत्यू झाला तर ही रक्कम दिली जाईल असं मेसेजमधून सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्टचेकनं या मेसेजची सत्यता लोकांना सांगितली आहे.

काय आहे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ?
या योजनेअंतर्गत जर कुणी गुंवतणूक केली आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. मे 2015 रोजी ही योजना सुरू केली होती. यासाठी पॉलिसीधारकाला वार्षिक 330 रुपये जमा करावे लागतात.

काय आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ?
या योजनेअंतर्गत सरकार केवळ महिन्याला 1 रुपये प्रमाणे 2 लाखांचा विमा देतं. ही योजना मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली आहे. यात वार्षिक 12 रुपये भरावे लागतात. संबंधित व्यक्तीला यात अनेक प्रकारचे विमा कव्हर दिले जातात. ही रक्कम लिंक केलेल्या बँक खात्यातून दरमहा वजा केली जाते. अपघातात कायमस्वरूपी अपंगत्वासाठी 2 लाख तर अंशत: अपंगत्वासाठी 1 लाख दिले जातात.

काय आहे पीआयबी फॅक्टचेक ?
पीआयबी फॅक्टचेक केंद्र सरकारची धोरणं, योजना, विभाग, मत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काम करते. संबंधित बातमी खरी की खोटी हे तपासण्यासाठी कुणीही पीबीआयची मदत घेऊ शकतं. 8799711259 या पीआयबी फॅक्टचेक व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातम्यांची लिंक पाटवता येते. याशिवाय [email protected] यावर मेलही करता येतो.