खुशखबर ! ‘कोरोना’पासून संरक्षणाची पहिली ‘लस’ दिलेल्या ‘ती’ महिला म्हणाली – ‘Doing Fine’

लंडन : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धूमाकूळ घातला आहे. युरोप आणि अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक देश कोरोना व्हयरसवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच धरतीवर इंग्लंडमधील ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणीला सुरुवात करण्यात आली. ज्या महिलेवर पहिल्यांदाच या लसीचा प्रयोग करण्यात आला होता. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे अशी बातमी परदेशातील काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिली होती. परंतु ती महिला जिवंत असल्याची माहिती आता समोर आली आहे. एलिसा ग्रॅनाटो असे या महिलेचे नाव असून त्या एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.

मायक्रोबायोलॉजिस्ट एलिसा यांना शुक्रवारी ही लस टोचण्यात आली होती. यानंतर रविवारी (दि. 26) त्यांचे निधन झाले असे वृत्त परदशातील इंग्रजी प्रसारमध्यमांनी दिले. एलिसा यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. एलिसा यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर एलिसा यांनी तसे काहीही झाले नसून आपली प्रकृती उत्तम असल्याचे स्वत: एलिसा यांनीच सांगितले आहे.

एलिसा ग्रॅनाटो यांच्यासंदर्भात संशोधकांनी एक निवदेनही दिले आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर काही तासांनी एलिसा यांच्या शरिरातील गुंतागुंत वाढली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच त्यांची प्रकृती खालावली होती. संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली असताना कोरोनावरील प्रायोगिक लस घेण्याची हिम्मत दाखवणआऱ्या एलिसा या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ज्या दोन जणांना ही लस टोचण्यात आली होती त्यापैकी एलिसा या त्यापैकी एक होत्या. आणखी चार स्वयंसेवकही या लसीच्या रिअ‍ॅक्शनशी फाईट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष असल्याचे अधिकाऱ्यान सांगितले

स्वत:वर झालेल्या मानवी चाचणीनंतर एलिसा यांनी सांगितले होते की, एक वैज्ञानिक म्हणून मला या संशोधनाला पाठिंबा द्यावा वाटतो. आतापर्यंत या विषाणूवर कोणताही अभ्यास न केल्याबद्दल मला वाईट वाटले, परंतु आता मला, असे वाटते की सहयोग करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.