Fact Check : ‘या’ मॉडेलनं आपल्या डार्क स्किनमुळं खरंच मिळवलं का गिनीज बुकमध्ये स्थान ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  क्वीन ऑफ डार्कच्या नावानं प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल न्याकिम गॅटवेच दक्षिण सूडानी वंशाची आहे. न्याकिम सध्या जगभर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. काही साईट्सनं असा दावा केलाय की, 27 वर्षीय न्याकिम आपल्या सुंदर अशा डार्क कलरसाठी प्रसिद्ध आहे. तिनं याच सौंदर्याच्या जीवावर खूप नाव आणि प्रसिद्धी कमावली आहे.

जगातील सर्वात डार्क स्किनची व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये खरंच न्याकिमचं नाव नोंदवलं आहे का. अनेक साईट्स आणि सोशल युजर्स असाच दावा करत आहेत.

परंतु या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, गिनीज बुकमध्ये स्किन टोनसाठी कोणतंही रेकॉर्ड ठेवण्यात आलेलं नाही.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं ट्विटर हँडल चाळल्यानंतर असं समजलं आहे की, न्याकिमबद्दल जो दावा केला जात आहे त्याचं गिनीज बुककडून खंडन करण्यात आलेलं आहे. 28 एप्रिल 2020 रोजी @iChopTweets च्या एका उत्तरात गिनीज बुकनं सांगितलं की, फेक न्यूज अलर्ट. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्किन टोनसाठी रेकॉर्ड ठेवण्यात आलेलं नाही. @iChopTweets नं याला उत्तर देत या सूचनेसाठी माफीही मागितली आहे. यात या युजरनं न्याकिमसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट्सही टाकले आहेत.

https://twitter.com/iChopTweets/status/1254852858941300737?s=20

यावरून स्पष्ट होत आहे न्याकिम गॅटवेच बद्दल जो काही दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. त्वचेच्या रंगासाठी गिनीज बुकमध्ये कोणतेही रेकॉर्ड ठेवण्यात आलेले नाही.