Fact Check | महिन्यात ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागणार 173 रुपयांचा टॅक्स? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : Fact Check | देशात एक ऑगस्टपासून टॅक्स आणि बँकिंग नियमात प्रस्तावित बदल लागू झाल्यानंतर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक यूजर्स हा दावा करत आहेत की, महिन्यात एटीएममधून चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास 150 रुपये टॅक्स आणि 23 रुपयांचा सर्व्हिस चार्ज मिळून 173 रुपये टॅक्स कापला (Fact Check) जाईल. तर एक ऑगस्टपासून बँकेत चार ट्रांजक्शनच्या नंतर प्रत्येक ट्रांजक्शन म्हणजे व्यवहारावर 150 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

काय सांगतो नियम

आरबीआयनुसार कोणतीही बँक अशा स्थितीत 20 रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ शकत नाही. ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहिना 5 ट्रांजक्शन किंवा व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही. महानगरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा तीन केली आहे, तर छोट्या शहरांमध्ये अन्य बँकांच्या एटीएममधून महिन्यात पाचवेळा (आर्थिक आणि बिगर आर्थिक) मोफत ट्रांजक्शन करू शकतो.

Pune Crime | पुण्याच्या उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा ‘थरार’; दुचाकीवरुन आलेल्या गुंडांनी झाडल्या 6 गोळ्या, प्रचंड खळबळ

ठरलेली मर्यादा संपल्यानंतर प्रति ट्रांजक्शन कमाल 20 रुपये आणि जीएसटी असे शुल्क द्यावे लागेल. आरबीआयने आता हे शुल्क 20 रुपयांवरून वाढवून 21 रुपये करण्याची परवानगी बँकांना दिली आहे, हा निर्णय एक जानेवारी 2022 पासून लागू होईल.

यामुळे सोशल मीडियावर वायरल पोस्टमधील दावा बनावट आहे. मोफत रोख रक्कम काढण्याच्या ठराविक संख्येनंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून 150 रुपये टॅक्स आणि 23 रुपयांचा सर्व्हिस चार्ज मिळून 173 रुपये प्रति व्यवहार कापून घेतले जातील असा दावा वायरल पोस्टमध्ये केला आहे, तो चूकीचा आहे.

2017 मध्ये एचडीएफसीसह अनेक खासगी बँकांनी प्रति महिन्यासाठी ठरलेल्या मोफत चार
ट्रांजक्शन नंतर प्रति व्यवहारावर 150 रुपयांचे शुल्क घेण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्येक
बँकेचे हे शुल्क वेगळे आहे. भारतीय स्टेट बँकेत जाम खात्यात महिन्यात तीनवेळा रोख जमाची
सुविधा मोफत आहे. चौथ्या व्यवहारासाठी बँक 50 रुपये (आणि जीएसटी) प्रति व्यवहारच्या हिशेबाने शुल्क घेते.

हे देखील वाचा

Anti Corruption | बारामतीमध्ये कर्मचार्‍याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा  डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल

LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  fact check story withdrawing money from atm more than four times in a month will attract tax of rs 173 know the truth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update