Fact Check Video | पाण्यातून अचानक जमीन वर येण्याचे काय आहे रहस्य, जाणून घ्या वायरल व्हिडिओचे ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  सोशल मीडियावर एक व्हिडिओ खुप वायरल (Fact Check Video) होत आहे ज्यामध्ये पाण्याने भरलेल्या एका तलावासारख्या शेतीमधून पाणी अचानक कमी होऊ लागते आणि जमीन वर येऊ लागते. यानंतर पाण्यातून वर आलेल्या जमीनीला भेगा पडू लागतात आणि त्याची माती जवळच भरलेल्या पाण्यात पडू लागते. या घटनेसोबत हकीकत सांगितली जात आहे की, पहा जमीन आपोआप वर येत आहे, हा एक नवीन अनुभव आहे, पहा पाणी खाली जात आहे आणि जमीन वर येत आहे, हा चमत्कार (Fact Check Video) आहे.

1 मिनिटे 58 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप शेयर केला जात आहे.
अनेक लोक यास निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत आणि म्हणत आहेत असा चमत्कार तुम्ही कधी पाहिला नसेल… पानीपत यूपी बॉर्डरवर निसर्गाचा चमत्कार, जमीन वर येताना दिसत आहे.
व्हिडिओ पोस्ट करताना एका ट्विटर यूजरने लिहिले आहे,
पानीपत युपी बॉर्डरवर जमीन अचानक वर येऊ लागली, निसर्गाचा चमत्कार.

 

अचानक पाण्यातून वर आली जमीन

आजतकच्या वायरल टेस्ट टीमला आढळले की, दावा सत्य आहे परंतु हा व्हिडिओ हरियाणाच्या पानीपतचा नसून करनालच्या कुचपुरा गावातील आहे आणि तो 14 जुलै 2021 चा आहे.
ही घटना कुचपुरा गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात घडली.

भयंकर उन्हाळा आणि दुष्काळानंतर जमीनीच्या खालील तापमान खुप जास्त वाढले होते.
यानंतर अचानक तिथे मुसळधार पाऊस झाला तेव्हा जमीनीखाली जास्त तापमान असल्याने खड्डा असलेल्या शेतात जमलेले पाणी आतून जलवाष्प/गॅसमध्ये रूपांतरीत झाले.
ज्यामुळे तिथे मोठा दाब निर्माण झाला आणि यामुळे जमीनीचा वरचा थर वरच्या बाजूला उचलला गेला. आजतकच्या टीमने काही की वर्ड्स आणि या व्हिडिओतून काढलेल्या छायाचित्रांना रिव्हर्स
सर्च केले तेव्हा समजले की, हा व्हिडिओ हरियाणाच्या करनालच्या कुचपुरा गावातील आहे.

Web Title : Fact Check Video | fact check video showing farm lands rose up from water

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण