Fact Check | प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला केंद्र सरकार नोकरी देतंय का? जाणून घ्या या वायरल बातमीचे सत्य

नवी दिल्ली : Fact Check |कोरोना काळात अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. स्थिती अशी आहे की, नोकरीच्या (Job) नावावर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. कुणी लोकांना राज्य सरकारच्या योजनेचे अमिष दाखवत आहे तर कुणी केंद्राच्या योजनेचे. या दरम्यान सोशल मीडियावर (social media) ’एक कुटुंब एक नोकरी’ नावाची एक कथित सरकारी योजना सुद्धा चर्चेत आहे. सोशल मीडियावर काही लोक या योजनेचा उल्लेख करत म्हणत आहेत की केंद्र सरकार (central government) या अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देणार आहे.

एका यूट्यूब चॅनलद्वारे दावा केला जात आहे की, एक कुटुंब एक सरकारी नोकरी योजना 2020, (One Family One Government Job Plan 2020) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केली आहे, ज्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जात आहे. ही योजना लागू झाल्यानंतर देशातील तरूणांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

अखेर काय आहे सत्य?
या बातमीची पडताळणी करत पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, एक कुटुंब एक नोकरी नावाची कोणतीही योजना सुरू नाही. कोणत्याही सरकारी वेबसाइटवर आम्हाला या योजनेची माहिती मिळाली नाही. जर सरकार इतक्या मोठ्या योजनेची घोषणा करत असेल तर देशातील तमाम मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये याची चर्चा झाली असती. परंतु आम्हाला कोणत्याही प्रतिष्ठित मीडिया वेबसाइटमध्ये या संबंधी कोणतीही बातमी मिळाली नाही.

सरकारी नोकरी देण्याचा हा बनावट दावा मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. यासाठी पीआयबी फॅक्ट चेकच्या माहिती विभागाने सुद्धा मार्चमध्ये हा दावा फेटाळला होता.

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीला लग्न झाल्याचे भासवून केला बलात्कार; काही दिवस एकत्र राहिल्यानंतर दिले आईवडिलांकडे सोडून

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : fact check viral post social media central government sarkari job family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update