Fact Check : सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात म्हटले आहे की, सरकार 3 महिन्यांसाठी 100 मिलियन म्हणजे 10 कोटी युजर्सना मोफत इंटरनेट देत आहे. आणि ही ऑफर 29 जूनपर्यंत Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) ग्राहकांना घेता येईल, असे सांगितले आहे. मात्र प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरोने हा मेसेज Message खोटा असल्याचे सांगितले आहे. PIB ने 1 जूनला फसव्या व्हाट्सअ‍ॅप मेसेजची Message माहिती ट्विट केली आहे. तसेच एक छोटासा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

या मेसेजमध्ये लिहिले आहे की सरकार मोफत इंटरनेट देत आहे आणि ही ऑफर 29 जूनपर्यंत Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) युजर्ससाठी उपलब्ध आहे. मेसेजमध्ये एक लिंक देखील दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडते.

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस

या वेबसाइटवर तुम्हाला तुमची खाजगी माहिती टाकून सबमिट करावी लागते. परंतु, असे केल्याने तुमची खाजगी माहिती चुकीच्या लोकांच्या हातात पडू शकते. त्यामुळे अश्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये. असे फसवे मेसेज सतत व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी एक मेसेज व्हायरल झाला होता, ज्यात WhatsApp Pink मिळवण्याचा दावा केला गेला होता, जो हॅकर्सना युजर्सच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवून देत होता. त्यामुळे अशा मेसेजला आळा घालण्यासाठी तो पुढे पाठवणे बंद करावे, असे म्हटले आहे.

चमत्कार ! मजूरांचे रातोरात बदलले होते नशीब, खोदकामात जमिनीत गाडलेला लाखो रुपयांचा ‘खजिना’ मिळाला

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस